‘तू फक्त एकटी ये मैत्रिणीला नको आणू ‘ , पोलीस शोधत आहेत सीसीटीव्ही

शेअर करा

महाराष्ट्रात एक धक्कादायक घटना समोर आली असून ‘ मला तुझ्या सोबत रिलेशन ठेवायचे आहे म्हणून येताना तू फक्त एकटी ये मैत्रिणीला सोबत घेऊन येऊ नकोस’, असे म्हणत एका महाविद्यालयीन तरुणीला वाटेत आडवत एका तरुणाने तिचा विनयभंग केल्याची घटना सातारा येथे घडलेली आहे. सदर प्रकरणी एका अनोळखी व्यक्तीवर सातारा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, सातारा येथील एका महाविद्यालयामध्ये 20 वर्षीय तरुणी शिक्षण घेत असून शुक्रवारी ती दुपारी एक वाजता चाललेली असताना पाठीमागील दुचाकीवरून एक युवक तिच्या जवळ आला आणि त्याने तिला तिचा मोबाईल हिसकावून घेत तिला अडवत ,’ तुला तुझा फोन परत देतो पण माझे तुझ्यावर प्रेम आहे. तुझ्यासाठी मी जीव पण देईन ‘, असे म्हणत तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.

आपल्या सोबत झालेल्या या धक्कादायक प्रकार यानंतर पीडित तरुणी ही घाबरून गेली आणि तिने सातारा शहर पोलीस ठाण्यात जात या व्यक्तीच्या विरोधात तक्रार दाखल केली. सदर तरुण कोण होता याची पिडीत तरुणीला माहिती नसून त्याच्या शोधासाठी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासायला सुरुवात केली आहे.


शेअर करा