‘ तू बांगलादेशी आहेस ‘ , पीडितेची कहाणी ऐकून पोलिसही सुन्न झाले

शेअर करा

महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना उघडकीस येत असून अशीच एक घटना नागपाडा इथे उघडकीस आली आहे . एका वीस वर्षीय तरुणीची दलालांच्या तावडीतून सुटका केल्यानंतर तिने सांगितलेल्या अत्याचाराच्या कथा ऐकून पोलिसही सुन्न झाले आहेत . सदर तरुणी ही बांगलादेशची असून तिला एका हॉटेलमध्ये डांबून ठेऊन तिच्यावर अत्याचार केले जात होते .’ बांगलादेशी असल्याने तुला जेलमध्ये जावे लागेल ‘ असे सांगत कित्येक जणांसोबत या दलालांनी तिचा सौदा केला होता. तब्बल दोन वर्षे हा अत्याचार सुरु होता मात्र अखेर पोलिसांनी या प्रकरणात सोनू कुमार नावाच्या एका दलालाला अटक केली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, पीडित तरुणी ही मूळची बांगलादेशातील दादरा गावातील रहिवासी आहे. पीडित तरुणी सात वर्षांची असतानाच तिच्या आई वडिलांचा घटस्फोट झाला नि त्यानंतर आई आणि वडील वेगवेगळे झाले. वडिलांनी दुसरे लग्न केले तर आईदेखील तिला वाऱ्यावर सोडून निघून गेली. पीडितेच्या आजीनं अवघ्या चौदाव्या वर्षी पीडितेचं लग्न लावून दिलं आणि सोळाव्या वर्षी पीडित तरुणी आई देखील बनली.

आता सर्व काही चांगले चालू राहील असा विचार करत असताना पीडित तरुणीच्या पतीचे एका दुसऱ्या महिलेसोबत संबंध सुरु झाले आणि त्याने तिला व मुलीला वाऱ्यावर सोडून पलायन केले. मुलीचे संगोपन करण्यासाठी काहीतरी काम करण्याच्या आशेने तिला काही महिलांनी कोलकाता इथे आणले आणि तिला देहव्यापारात ढकलले.

त्यानंतर ती मुंबईला आली आणि आरोपींनी तिला एका हॉटेलमध्ये डांबून ठेवलं आणि तिच्या शरीराची बोली लावणे सुरु केलं. सततच्या होणाऱ्या या अत्याचाराला वैतागून डी बी रोड पोलीस ठाणे गाठत पीडितेने झालेल्या अत्याचाराची व्यथा मांडली आहे. पोलिसांनी सोनु कुमार नावाच्या एका दलालाला अटक केली असून पुढील तपास सुरु असल्याचे समजते.


शेअर करा