तेव्हा वडिलांनी माझे लैंगिक शोषण केलं , खुशबू सुंदर म्हणाल्या की ?

शेअर करा

आपल्यावरील अत्याचाराविषयी अनेकदा महिला बोलण्याचे टाळतात मात्र नामांकित सेलिब्रिटीदेखील आता याविषयी मौन सोडत असून राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्य खुशबू सुंदर यांनी मी आठ वर्षाची असताना वडिलांनी माझे लैंगिक शोषण केले होते असा गौप्यस्फोट केलेला आहे. खुशबू सुंदर या अभिनेत्री आणि भाजप नेत्या देखील आहेत.

खुशबू सुंदर म्हणाल्या की, पंधराव्या वर्षापर्यंत मला वडिलांच्या विरोधात बोलण्याची हिंमत होत नव्हती. मी माझ्या वडिलांना देव मानत होते. वडिलांनी केलेल्या लैंगिक शोषणाबद्दल आईला सांगायचे होते पण आई त्यावर विश्वास ठेवणार नाही अशी मला खात्री असल्याने मी या प्रकरणी आईला कधीच बोलले नाही.

खुशबू सुंदर यांचा मुंबई इथे जन्म झालेला होता. लहानपणापासूनच त्यांना अभिनयाची आवड असल्याकारणाने त्यांनी अनेक चित्रपटात देखील काम केले त्यानंतर 2010 साली त्यांनी द्रमुक पक्षात प्रवेश केला त्यानंतर काँग्रेस पक्षात त्या गेल्या अन तिथे काही मतभेद झाल्यानंतर आता सध्या त्या भारतीय जनता पार्टीत कार्यरत आहेत.


शेअर करा