थेरगाव क्वीन सोबतच्या ‘ त्या ‘ लांब केसांच्या तरुणाला देखील बेड्या , पोलिसांचा दांडू दिसताच ..

शेअर करा

पुणे शहर आणि परिसरात आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वरून धमकीची भाषा वापरणाऱ्या थेरगाव क्वीन साक्षी हिच्यासोबत अनेक व्हिडिओमध्ये झळकलेला तिचा मित्र कुणाल राजू कांबळे याला देखील सामाजिक सुरक्षा विभागाने बेड्या ठोकल्या असून साक्षी हेमंत श्रीश्रीमल (१८) आणि साक्षी राकेश कश्यप (१८) यांना आधीच अटक करण्यात आली होती. तिघांवर कलम २९२, २९४, ५०६, ३४ सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुणाल राजू कांबळे याला पोलिसांनी चांगलेच नीट केले असून त्याचे हात जोडल्याचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

शिवराळ आणि अश्लील बोलले की व्हिडीओ पॉप्युलर होतात म्हणून असे उपद्याप करणाऱ्या टोळक्यांच्या विरोधात पोलिसांनी आता मोहीमच राबवायला सुरु केले आहे.साक्षी असं या तरुणीचे नाव असून पिंपरी-चिंचवडमध्ये ती स्वयंघोषित लेडी डॉन म्हणून शिवराळ भाषेचा वापर करत व्हायरल व्हिडीओ बनवत होती. या तरुणीने इंस्टाग्रामावर आपल्या 50 हजार लाईक मिळावे म्हणून धमकीची भाषा वापरत व्हिडीओ बनवला होता. खुनासाठी असलेले कलम ३०२ चा उल्लेख करत तिने भाई आणि नेते यांना देखील धमकी दिली होती .

साक्षी आणि कुणाल राजू कांबळे त्याच बरोबर त्यांचे इतर मित्र इन्स्टाग्रामवर “थेरगाव क्वीन” नावाच्या प्रोफाइलवरून अशा स्वरूपाचे व्हिडीओ आणि रील्स बनवत होते. सुरवातीला नागरिक करमणूक म्हणून हे व्हिडीओ पाहायचे मात्र त्यातून यांचा उत्साह आणखीन वाढत असल्याचे पाहून त्यांनी धमकावयाला देखील सुरु केले. सदर व्हिडीओ चर्चेत आल्यावर पोलिसांना त्याची दखल घ्यावी लागली आणि त्यांनी या सर्वांविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल केले.

पोलिस उपनिरीक्षक संगीता गोडे यांनी फिर्याद दिली असून थेरगाव क्वीन या नावाने इंस्टाग्राम अकाउंट चालविणारी साक्षी आणि तिच्या सोबत असणारा आरोपी कुणाल कांबळे यांनी सार्वजनिक ठिकाणी अश्लील भाषा व शब्द वापरलेले व्हिडीओ तयार केल्याचे निष्पन्न झाले. आरोपींनी धमकीवजा व्हिडीओ बनवून ते स्वतःच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून व्हायरल केले. आरोपींवर अश्लील शिवीगाळ व भाषेचा वापर केलेले व्हिडिओ, फोटो सोशल मीडियावर व्हायरल करणे, या व्हिडीओमुळे समोरील व्यक्तीस लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करणे, धमकी देणे तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यातर्गत गुन्हा दाखल झाला आहे.


शेअर करा