दारू पिऊनही ‘ नशा ‘ येईना म्हणून केलेला अघोरी प्रयोग अंगलट , युवकाचा मृत्यू

शेअर करा

देशात एक खळबळजनक अशी घटना मध्यप्रदेशात समोर आली असून इंदोर येथील एका व्यक्तीने दारू पिऊन देखील नशा येत नसल्याने चक्क दारूमध्ये ऍसिड टाकले आणि ती दारू प्राशन केली त्यानंतर अवघ्या काही मिनिटांच्या आत त्याची तब्येत बिघडली आणि त्याचा मृत्यू झालेला आहे. रोज दारु पिणारा हा युवक गेल्या काही दिवसांपासून दारू पिऊन आपल्याला नशा येत नाही म्हणून त्रस्त होता त्यातून त्याने हा अघोरी प्रयोग केला आणि आपले प्राण गमावले.

उपलब्ध माहितीनुसार, इंदोर येथील आझाद नगर पोलिस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या पवनपुरी वसाहतीत ही घटना समोर आली असून राजाराम असे या युवकाचे नाव असल्याचे समजते. सतत दारू पीत असल्याने त्याला दारूची नशा देखील येत नव्हती आणि तो पूर्णपणे नैराश्यात गेला होता. त्याला कुणीतरी दारूमध्ये ऍसिड टाकून पी असा सल्ला दिला त्यानंतर त्याने नशा येण्यासाठी हा देखील अघोरी प्रयोग केला.

ऍसिड मिक्स केलेली दारू त्याने पिली आणि अवघ्या काही मिनिटांत त्याच्या पोटात त्याला भयावह असा त्रास सुरू झाला. त्याच्या घरच्यांनी तात्काळ त्याला रुग्णालयात नेले मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झालेला होता. दारूमध्ये ऍसिड मिक्स केले गेले होते असे डॉक्टरांनी सांगितले असून मयत व्यक्तीच्या कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.


शेअर करा