‘ दिलबर दिलबर ‘ वर अनाहूत व्यक्तीनेही धरला भन्नाट ठेका , पहा व्हिडीओ

शेअर करा

सोशल मीडियावर चर्चेत येण्यासाठी अनेक तरुण- तरुणी इंस्टाग्रामवर स्वतःचे रिल्स बनवतात आणि त्यानंतर झटपट चर्चेत येतात. रील्स बनवण्यासाठी लोकेशन कुठले असावे याचे काही बंधन नसल्याने अनेक ठिकाणी रेल्वे स्टेशन, बस स्थानक या ठिकाणी देखील असे व्हिडिओ बनवणाऱ्यांची काही कमी नाही. कॅमेरा सुरू व्हायची कमी की लगेच हे व्हिडिओ सुरू होतात मात्र अनेकदा आजूबाजूचे नागरिक देखील याने गोंधळात पडतात आणि काही व्यक्ती त्यांच्या या रील्समध्ये आपण यावे म्हणून धडपडतात देखील..

असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून इंस्टाग्रामवर रील्स बनवण्यासाठी मार्केटमध्ये एका तरुणीने डान्स सुरू केला यानंतर आजूबाजूला देखील लोकांची गर्दी झाली. एक जण हा व्हिडिओ रेकॉर्ड करत असताना ही तरुणी दिलबर दिलबर या गाण्यावर डान्स करत होती मात्र शूटिंग सुरू असताना पाठीमागे एक व्यक्ती आला आणि त्याने देखील या तरुणीच्या सोबत डान्स सुरू केला तिच्या डान्स स्टेप पाहून त्यानेदेखील तशाच पद्धतीचा स्टेप घेतल्या तो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये सदर मुलगी ही जशा डान्स स्टेप करते त्याप्रमाणे खाके रंगाचे कपडे घातलेला तिच्या पाठीमागे एक व्यक्ती येतो आणि तोदेखील डान्स सुरू करतो . सोशल मीडियावर या व्हिडिओला मोठी पसंती मिळत आहे तर अनेक नागरिक वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या प्रतिक्रिया देखील देत आहेत . आतापर्यंत आपण अनेक डान्स पाहिले पण रील्स पाहिले नाही अशा देखील प्रतिक्रिया येत असून तरुणीच्या उत्साहाची देखील जोरदार तारीफ करण्यात येत आहे.


शेअर करा