दिवसा कपबशा विकायचा धंदा अन रात्र झाली की ..

शेअर करा

सध्या जालना येथील एका चोराची जोरदार चर्चा सुरू असून दिवसा हा चोर कपबशी विक्री करत दारोदार फिरायचा आणि याच दरम्यान घरासमोर लावलेल्या गाड्या यांची रेकी करायचा अन रात्रीच्या वेळी तो दुचाकी चोरायचा असे समोर आलेले असून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला ताब्यात घेतलेले आहे. त्याच्याकडून पन्नास हजार रुपये किमतीच्या दोन दुचाकी जप्त करण्यात आलेल्या आहेत.

उपलब्ध माहितीनुसार, शेख मुख्तार आरिफ शेख मुख्तार ( राहणार इस्लामवाडी तालुका जिल्हा जालना ) असे आरोपीचे नाव असून त्याने शहरातील वेगवेगळ्या भागातून दुचाकी चोरलेल्या असून तो त्या विकण्याच्या प्रयत्नात आहे अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग यांना मिळालेली होती त्यानंतर त्यांनी त्याला ताब्यात घेतले तेव्हा त्याने चोरलेल्या दोन दुचाकी पोलिसांच्या ताब्यात दिल्या.

आरोपी हा दिवसा शहरातील विविध भागात कपबशी विक्री करत फिरायचा मात्र याच दरम्यान परिसरात असलेल्या महागड्या दुचाकींची तो रेकी करायचा आणि रात्रीच्या सुमारास या दुचाकी चोरायचा असे समोर आलेले आहे. आरोपी आणि चोरलेल्या दुचाकी सध्या पोलिसांच्या ताब्यात असून त्याने इतरही काही ठिकाणी अशाच पद्धतीने चोऱ्या केल्या आहेत का ? याचाही तपास सुरू आहे.


शेअर करा