दुर्दैवी..राज्यात आणखी एका एसटी कर्मचाऱ्यांची आत्महत्या

शेअर करा

एसटी महामंडळाला शासकीय सेवेत समाविष्ट करून घ्यावे या मागणीसाठी गेल्या चार महिन्यांपासून संप सुरू असून अद्याप देखील बहुतांश ठिकाणी संपूर्ण क्षमतेने एसटी सुरू झालेली नाही. आंदोलक कर्मचाऱ्यांचे मात्र यामुळे आर्थिक हाल होत असून संपात सहभागी असलेल्या एका 41 वर्षीय एसटी कर्मचाऱ्यांने आर्थिक विवंचनेतून विष घेत विहीरीत उडी मारुन आत्महत्या केली आहे.

12 मार्च रोजी सकाळी नऊच्या सुमारास ही घटना उघडकीला आली असून या घटनेनंतर पीडित कुटुंबाला 50 लाख रुपये नुकसान भरपाई आणि कुटुंबातील एका सदस्याला नोकरी द्यावी यासाठी रुग्णालयातच कर्मचाऱ्यांच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले होते.

पठाण मुझफ्फरखान जफरखान ( वय 41 राहणार जिंतूर जिल्हा परभणी ) असे त्यांचे नाव असून विनावेतन कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा यामुळे ते मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले होते. 11 मार्च रोजी सकाळी ते घरातून बाहेर पडले आणि दुसऱ्या दिवशी तालुक्यातील भोगाव रिडज रस्त्यावरील भारत खिल्लारे यांच्या शेतातील विहिरीत विष प्राशन करून त्यांनी उडी मारत आत्महत्या केली. सदर घटनेविषयी परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून पोलिसांनी तात्काळ दाखल होत त्यांचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.


शेअर करा