देवाच्या गाभाऱ्यातच ‘ तो ‘ पेटला अन त्यानंतर मात्र ..

शेअर करा

महाराष्ट्रात एक खळबळजनक घटना नाशिक जिल्ह्यात उघडकीला आली असून ‘ आज सोमवार आहे माझा उपवास आहे म्हणून मी मंदिरात पूजेला चाललो आहे ‘ असे सांगून घराबाहेर पडलेल्या एका शिवभक्तांने मंदिरात पूजा केली आणि त्यावेळी त्याच्या हातातील भलामोठा दिवा निसटुन त्याच्या अंगावर पडला आणि कपड्यांनी पेट घेतला दुर्दैवाने त्यातच त्याचा मृत्यू झालेला असून सागर संपत खाटीकमारे ( वय 22 ) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. मंगळवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

उपलब्ध माहितीनुसार, सागर खाटीकमारे हा सोमवारी दुपारी कामावरुन घरी आला त्यावेळी त्याने आई वडिलांना सांगून मंदिरात दर्शनासाठी चाललोय म्हणून तो निघून गेला. अपार्टमेंटच्या समोर असलेल्या भगवान शंकराच्या मंदिरात दुपारी साडेचार वाजता पूजेसाठी तो गेला त्या वेळी पूजा करत असताना पेटलेला मोठा दिवा त्याच्या अंगावर पडला आणि त्याच्या कपड्यांनी पेट घेतला. दुर्दैवाने मंदिराच्या परिसरात त्या वेळी कोणीही नव्हते. शंकराची पिंड देखील खोलगट जागेत असल्याने त्या मंदिरातून सागर याला तेथून सहजासहजी बाहेर देखील पडता आले नाही.

प्रचंड भाजल्यानंतर कसातरी प्रयत्न करून तो मंदिराबाहेर आला त्या वेळी आजूबाजूच्या नागरिकांना मंदिरातून येणारा धूर आणि सागर दिसला त्यावेळी त्यांनी तात्काळ त्याला दवाखान्यात दाखल केले मात्र तोपर्यंत तो 95 टक्के भाजलेला होता. त्याच्यावर उपचार सुरू असतानाच पहाटे त्याचे निधन झाले सागर हा कुटुंबियांचा एकुलता एक कमवता मुलगा होता त्यामुळे कुटुंबावर मोठी शोककळा पसरली आहे तसेच मंदिराच्या गाभाऱ्यातील प्रवेशद्वार देखील लहान असल्याने त्याला बाहेर पडता आले नाही हे दुर्दैवी सत्य देखील उघड झाले आहे.


शेअर करा