‘ दोघींची मैत्री ‘ इतकी घट्ट की नको तो प्रकार करून बसल्या, एकीचा मृत्यू

शेअर करा

महाराष्ट्रातील एका अजब प्रकरणाची सध्या सोशल मीडियात जोरदार चर्चा सुरू असून नागपूर येथील हे प्रकरण आहे. जिया आणि पिंकी ( काल्पनिक नावे ) नावाच्या दोन तरुणींची एकमेकींसोबत मैत्री झाली. ही मैत्री इतकी कनिष्ठ होती की अवघ्या काही दिवसात त्यांच्या प्रेमसंबंध देखील सुरू झाले आणि त्यानंतर त्यांनी प्रेमाच्या सगळ्या मर्यादा पार केल्या. दोघीही आयटीआय कॉलेजमध्ये शिकत होत्या त्यावेळी त्यांच्यात हा प्रकार सुरू झाला. दरम्यानच्या काळात जीया हिच्या लग्नासाठी तिच्या घरच्यांनी मुलगा पाहण्यास सुरुवात केली त्यावेळी पिंकी हिने तिच्या लग्नाला विरोध केला त्यामुळे जीया हिने विष घेतले असा आरोप तिच्या घरच्यांनी केलेला आहे

जिया हिचे लग्न झाले तर आपण जगायचे कसे असा वाद निर्माण करत पिंकी आणि जिया यांच्यात जोरदार भांडण झालेले होते तर दुसरीकडे जिया गेल्या सात वर्षांपासून सचिन नावाच्या एका व्यक्तीच्या संपर्कात होती. जीया ही एकीकडे पिंकी हिच्यासोबत प्रेमसंबंध ठेवायची तर दुसरीकडे सचिन हिच्यासोबत देखील तिचे प्रेमप्रकरण सुरू होते . जिया हिचे लग्न होणार या कल्पनेने पिंकी अस्वस्थ झाली आणि त्यानंतर त्यांच्यात भांडणाला सुरुवात झाली.

सहा मार्च रोजी जीया आणि पिंकी आयटीआयमध्ये शिकत असताना जिया हिला तिच्या आईचा फोन आला त्यावेळी तिने तुला मुलगा बघायला येणार आहे त्याला केव्हा बोलावू ? असे विचारले त्यावेळी जीयाने चार वाजता त्याला बोलव असे सांगितले समोर उभ्या असलेल्या पिंकीने जियाला असे बोलताना पाहिले आणि त्यानंतर तिचा संताप अनावर झाला. जिया आणि पिंकी यांच्यात भांडण झाल्यानंतर जीया हिने अखेर विष घेतले असा आरोप ज्याच्या घरच्यांनी केलेला असून जिया हीचा आता मृत्यू झालेला आहे .

जियाने विष घेतल्यानंतर पिंकी घाबरून गेली आणि तिने तात्काळ तिला हिंगणा येथील लता मंगेशकर रुग्णालयात दाखल केले .जियाचे वडील तिथे आले आणि त्यांनी धंतोली इथे इतकी रुग्णालय असताना तू हिंगणा का गाठले ? असे विचारले असता तिने गडबडीत मला काही सुचलेच नाही असे कारण सांगितले. मृत्यूच्या दारात असताना वडिलांनी जिया हिला माहिती विचारली त्यावेळी तिने पिंकी आणि माझ्यामध्ये समलैंगिक संबंध होते. रात्री आम्ही एकमेकींना अश्लील मेसेज देखील करायचो असे म्हटलेले असून पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केलेली आहे.


शेअर करा