धक्कादायक..अल्पवयीन मुलीला जाळ्यात ओढले आणि त्यानंतर..

शेअर करा

महाराष्ट्रात एक धक्कादायक घटना सोलापूर येथे उघडकीला आली असून सोलापुरात सहावी इयत्तेत शिकलेल्या असलेल्या एका चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी विजापूर येथील मालप्पा सिद्धाप्पा वडरे याच्या विरोधात सोलापूर इथे बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर प्रकरणी पीडित मुलीने तक्रार दिलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार पीडित मुलगी ही सोलापूर शहरात इयत्ता सहावीमध्ये शिकत असून कर्नाटकात पीडितेच्या आजोबांची शेत जमीन आहे यानिमित्त ती कर्नाटक येथे ये-जा करत असताना तिची आरोपी यांच्यासोबत ओळख झाली होती. ओळख झाल्यानंतर आरोपी हा कोल्हापूर येथे येऊन पीडित मुलीला सातत्याने भेटत असायचा.

काही कालावधी गेल्यानंतर त्याने तिला कर्नाटक आणि सोलापूर जवळच्या एका गावात नेले आणि तिथे तिच्यावर अनेक वेळा अत्याचार केले. सदर बाब ही पीडित मुलीने आपल्या आजीला सांगितली त्यानंतर या प्रकाराला वाचा फुटली. पीडित मुलीने आरोपी विरोधात फिर्याद दिली असून पोलीस घटनेचा शोध घेत आहेत.


शेअर करा