धक्कादायक..कॉलबॉयची जाहिरात वाचून पुढं जे घडलं ते ‘ अकल्पनीय ‘ होत

शेअर करा

देशात अनेक धक्कादायक घटना समोर येत असून अशीच एक घटना मुंबईत उघडकीस आली आहे . जिगेलो बनण्याची हौस असलेल्या एका तरुणाला आपल्या जाळ्यात अडकवून त्याची तब्बल दीड लाखांना फसवणूक करण्यात आली आहे. आपल्या स्वप्नांचा चुराडा झालेला पाहून त्याने पोलिसात धाव घेतली आणि मुंबईतील माटुंगा पोलिसांनी शुक्रवारी ३० वर्षीय रोहित कुमार गोवर्धन याला दिल्ली येथून अटक केली. सदर प्रकरणात कार्यरत असलेली महिला मात्र फरार झाली आहे .

काय आहे प्रकरण ?

तक्रारदार तरूण हा चक्क पोलिसाचाच मुलगा असून त्याने इंटरनेटवर कॉल बॉयची एक जाहिरात पाहून पैसे मिळवा अशी जाहिरात वाचली होती. कॉल केल्यावर समोरील व्यक्तीने त्याला सांगितलं की, तो जिगोलो कंपनी चालवतो आणि यात आम्ही कॉल बॉयला ट्रेनिंग देतो. एकदा ट्रेनींग दिले की कंपनीच्या फीमेल क्लाएंट्सचं सर्व पद्धतीने मनोरंजन करायचं असतं. क्लाइंटकडून जेवढी रक्कम मिळेल त्यातील २० टक्के कंपनी घेते आणि बाकी रक्कम तुला दिली जाईल. बिनभांडवली आणि कमी कष्ट असणाऱ्या या व्यवसायासाठी तरुण लगेच तयार झाला.

तरुणाच्या म्हणण्यानुसार कंपनीने एके दिवशी एका फीमेल क्लाइंटचा नंबर दिला असता त्या महिलेने मीटिंगसाठी हॉटेलमध्ये रूम बुक करायची असून मला त्यासोबतच तिथे पोहोचण्यासाठी टॅक्सी, ड्रायव्हर आणि इतर वस्तूंची गरज लागेल. या सर्व कामांसाठी तुला माझ्या अकाऊंटमध्ये ३२ हजार रूपये पाठवावे लागतील. मीटिंग झाल्यावर तुला जी फी देणार आहे त्या फीसोबत हे पैसे परत दिले जातील असे म्हटल्यावर तरुणाने तिला पैसे देऊन टाकले मात्र ती काही आली नाही .

तरूणाने कंपनीतील व्यक्तीला फोन केला असता त्याने डील कॅन्सल झाली आहे पण निराश होऊ नकोस तुला दुसऱ्या क्लाइंटचा नंबर दिला जाईल असे सांगून पुन्हा एका दुसऱ्या महिलेचा नंबर देण्यात आला मात्र यावेळी देखील पुन्हा पहिल्यासारखेच झाले आणि अशाच पद्धतीने जवळपास दीड लाखांना लुटण्यात आले. पैसे खर्च करून काहीच काम झाले नाही म्हणून त्या तरुणाच्या मनात फसवणुकीची भावना झाली आणि त्याने पोलिसात धाव घेतली .

२२ डिसेंबर २०२१ ला याप्रकरणी एफआयआर दाखल झाली होती. बॅंक डिटेल्सची चौकशी केली गेली आणि आरोपीला दिल्लीहून अटक केली. पोलीस महिलेबाबत माहिती मिळवत आहेत. पोलिसांनी सांगितलं की, महिला विवाहित आहे आणि आरोपी गोवर्धनसोबत तिने काम करून पैसे हस्तगत केले आहेत तर पीडित तरुण यास अद्यापपर्यंत खर्च केलेली रक्कम मिळाली नाही.


शेअर करा