धक्कादायक.. पुण्यात पाच वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचाराची घटना, आरोपी अटकेत

शेअर करा

महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना उघडकीस येत असताना अशीच एक घटना पुणे शहरानजीक पिंपरी येथे उघडकीस आली असून परप्रांतीय तरुणाकडून चक्क एका पाच वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आले आहेत. सदर प्रकरणी या तरुणाला अटक करण्यात आली आहे

उपलब्ध माहितीनुसार, रावेत पोलीस चौकीच्या हद्दीत दोन फेब्रुवारीला दुपारी पावणेचार ते चारच्या दरम्यान ही घटना घडली असून 24 वर्षीय महिलेने शनिवारी रावेत पोलिस चौकीमध्ये धाव घघेत सुसंता राजेंद्रनाथ बस्के ( राहणार पश्चिम बंगाल ) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादीच्या पाच वर्षाच्या मुलीसोबत आरोपीने अश्‍लील वर्तन आणि गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला तसेच तिला ठार मारण्याची देखील धमकी दिली, असे सांगण्यात आले आहे.


शेअर करा