धक्कादायक..’ बघ तुझी आई ‘ , पीडितेच्या मुलीच्या फोनवर आईचे तसले फोटो

शेअर करा

महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना समोर येत असून अशीच एक घटना अमरावती जिल्ह्यात उघडकीस आली आहे. एका महिलेशी केलेल्या शारीरिक संबंधांचे फोटो एका आरोपीने चक्क त्या महिलेच्या मुलीला पाठवल्याने परिसरात एकच खळबळ उडालेली आहे. पीडितेच्या दिलेल्या तक्रारीवरून पथ्रोट पोलिसांनी आरोपी मो. सोहेल मो. शकील (२२, रा. काकडा, ता. अचलपूर) याच्याविरुद्ध बलात्कार, ॲट्राॅसिटी व माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार , ४० वर्षीय पीडितेच्या पतीचे चार वर्षांपूर्वी निधन झाले असून ती तिच्या दोन मुलांसह राहते आणि शेतीची कामे करून आपली उपजीविका चालवते. शेतीकामाच्या माध्यमातून तिची सहा महिन्यांपूर्वी आरोपीशी भेट झाली. एके दिवशी ती अन्य मजूर महिलांना घेऊन मो. सोहेलच्या ऑटोने लगतच्या गावातील शेतात जात असताना त्याने महिलेसोबत प्रेमसंबंध निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्यास पीडितेने नकार दिला.

त्यानंतर सहा महिन्यांपूर्वी पीडिता ही एका शेतात असताना त्याने तिचा विनयभंग करून तिच्यावर बलात्कार केला आणि याच दरम्यान त्याने तिची अश्लील छायाचित्र काढली तसेच शरीरसंबंधाचे देखील छायाचित्रण केले. सदर प्रकार हा मुलीला व नातेवाईकांना पाठविण्याची धमकी देऊन त्याने पीडितेचे वारंवार शोषण केले. त्याच्या या धमकीला घाबरून पीडिता शांत राहिली.

आरोपीने काही दिवसांपूर्वी पीडितेचे अश्लील व आक्षेपार्ह छायाचित्रे तिच्याच मुलीच्या व अन्य नातेवाईकांच्या मोबाईलवर टाकले. त्यामुळे पीडिताची सामाजिक बदनामी झाली. आरोपी तेवढ्यावरच थांबला नाही तर पीडिताच्या नातेवाईकांच्या घरी जाऊन त्याने ती छायाचित्रे त्यांना दाखविली. त्या बदनामी व त्रासाला कंटाळून अखेर तिने २७ डिसेंबर रोजी सायंकाळी पथ्रोट पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली.


शेअर करा