धक्कादायक..महिला वकिलानेच दिली महिलेची सुपारी , कुरिअर बॉय म्हणत..

शेअर करा

गुन्हेगार गुन्हे करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती अवलंबत असतो अशीच एक घटना गोंदिया जिल्ह्यात समोर आलेली असून कुरिअर पार्सल देण्याच्या बहाण्याने महिलेवर हल्ला करणाऱ्या दोन आरोपींना गोंदिया शहर पोलिसांनी अटक केली आहे . सदर कारवाई शनिवारी १९ तारखेला करण्यात आली असून धक्कादायक बाब म्हणजे या एका महिला वकीलाला देखील बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

सोनल शर्मा या महिलेच्या खुनाची चार लाख रुपयात सुपारी देण्यात आली होती आणि त्यातूनच तिच्यावर हल्ला करण्यात आला होता. शहरातील गणेश नगर परिसरातील दादा चौक येथील रहिवासी सोनल आशिष शर्मा ( वय ४० ) यांच्या घरी जाऊन 9 मार्च रोजी दुपारी एक वाजता आरोपी वकील महिला आणि आरोपी सुरज केशव रावते ( वय 50 ) यांनी महिलेच्या हातावर चाकूने वार करून खुनाचा प्रयत्न केला. सदर घटनेसंदर्भात शहर पोलिसांनी भा द वि 324 452 34 अन्वये गुन्हा दाखल केला होता. सदर प्रकरणात आरोपी सुरज रावते याच्यासह चाळीस वर्षीय महिलेला अटक करण्यात आलेली आहे

आरोपी महिलेची सोनल शर्मा तिच्या पतीसोबत ओळख होती त्यानंतर वकील महिलेने सोनल शर्मा यांना ठार मारण्यासाठी आरोपी सुरज रावते याला चार लाखात सुपारी दिली होती असे आतापर्यंतच्या तपासात निष्पन्न झाले आहे. सदर प्रकरणी पोलीस तपास करत आहेत.


शेअर करा