धक्कादायक..रस्त्यावरून खरेदी केलेल्या अन्नात चक्क ‘ पुरुषाचं लिंग ‘ : पहा व्हिडीओ

शेअर करा

जगात आजकाल कधी कोणती गोष्ट चर्चेत येईल याचा नेम राहिलेला नसून अशीच एक घटना आफ्रिकेतील घाना या देशात घडली असून एका महिलेने रस्त्यावरून खरेदी केलेल्या अन्नामध्ये चक्क पुरुषाचे गुप्तांग आढळून आल्याने परिसरात खळबळ उडालेली आहे . सदर महिलेने याचा व्हिडीओ शेअर केला असून त्याची सोशल मीडियात चांगलीच चर्चा रंगलेली आहे .

उपलब्ध माहितीनुसार , ‘तुओ जाफी’ हा पदार्थ आफ्रिकेतील घाना या देशात लोकप्रिय आहे म्हणून एका महिलेने तो पदार्थ एका रस्त्यावरील स्टॉलवरून विकत घेतला आणि त्याचा स्वाद घेण्यासाठी म्हणून तिने पाकीट फोडले असताना हा गंभीर प्रकार तिच्या निदर्शनास आला कारण त्यामध्ये तिला पुरुषाचं लिंग सापडलं. सदर प्रकार पाहून तिला धक्काच बसला.

तिने या प्रकाराचा व्हिडीओ तयार केला अन् तो सोशल मीडियावर शेअर केला. शिवाय स्ट्रीट फूड खाण्यापूर्वी तो निट तपासा अन्यथा असं काही तरी सापडू शकतं असा सल्ला देखील तिने या व्हिडीओद्वारे दिला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना धक्काच बसला. या प्रकरणी तिने पोलीस तक्रार देखील केली आहे. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. या पूर्वी देखील मानवी मांसाचे तुकडे घानामधील स्ट्रीट फूडमध्ये सापडल्याच्या घटना घडल्या आहेत.


शेअर करा