धक्कादायक..हॉटेलच्या बाहेरच त्याने तरुणीला धरून ओढले अन ..

शेअर करा

महाराष्ट्रात अनेक वेगवेगळ्या घटना समोर येत असताना अशीच एक घटना नाशिक येथे समोर आलेली असून शहरातील उच्चभ्रू परिसर समजल्या जाणाऱ्या डिसूझा कॉलनी परिसरात एका हॉटेलपुढे संशयिताने त्याच्या ओळखीच्या तरुणीचा हात धरुन तिला ओढले आणि तिच्या अंगावर थुंकला म्हणून संतप्त झालेल्या तरुणीने तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेत त्याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, सदर प्रकरणी संशयित असलेला आरोपी अभिमन्यू सूर्यवंशी ( राहणार पंचवटी ) याच्याविरुद्ध गंगापूर पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी 12 तारखेला सदर तरुणी ही रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास तिच्या कॉलेजच्या मित्र मैत्रिणीसोबत हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेली होती. हॉटेलमध्ये जेवण केल्यानंतर पीडित युवती आणि तिच्या मैत्रिणी हॉटेलमधून बाहेर पडत असताना संशयित आरोपी अभिमन्यू याने तिचा हात धरला आणि तिला स्वतःच्या बाजूने ओढले.

बळजबरी करत चुकीच्या ठिकाणी स्पर्श करत त्याने शिवीगाळ करत तिच्या तोंडाच्या दिशेने थुंकला, असेदेखील फिर्यादीचे म्हणणे आहे. फिर्यादी तरुणीने तात्काळ वेळ न दवडता गंगापूर पोलिसात आरोपीच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून सदर प्रकरणाचा पोलिस तपास करत आहेत.


शेअर करा