
सोशल मीडियावर सध्या उर्फी जावेद चांगलीच चर्चेत आलेली असून तिच्याविरुद्ध चित्रा वाघ असा संघर्ष रंगलेला पाहायला मिळत आहे. चित्रविचित्र पोषाखावरून तिच्यावर अनेकदा या आधी देखील निशाणा साधण्यात आलेला आहे मात्र चित्रा वाघ यांनी टीका केल्यानंतर याची जोरदार चर्चा सोशल मीडियात सुरू झाली. उर्फी जावेद कोण आहे याबद्दल ही चर्चा सुरू झालेली असून उर्फी जावेद करोडोच्या संपत्तीची मालकीन असल्याची देखील माहिती समोर आलेली आहे.
उर्फी जावेद ही मूळची उत्तर प्रदेशातील लखनऊ येथील असून तिच्याकडे कोट्यवधीची संपत्ती असून तिचे वय अवघे 24 वर्ष आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीत येण्याआधी तिची आर्थिक परिस्थिती हलाखीची होती अशा परिस्थितीत तिच्यावर आई आणि लहान बहिणीची जबाबदारी येऊन पडली. तिला दोन बहिणी असून आई-वडिलांचे फारसे पटत नसल्याने ती घराबाहेर पडण्याचा विचार करत होती. वडील सातत्याने शिवीगाळ करत असल्याने उर्फी घराबाहेर पडली याच दरम्यान तिच्या वडिलांनी दुसरे लग्न केले आणि ते वेगळे झाले.
कमी वयात मुंबईत दाखल झाल्यानंतर तिने अनेक बऱ्यावाईट गोष्टी पाहिल्या आणि मोठ्या प्रमाणात संघर्ष देखील केला. 1997 तिचा जन्म झालेला असून मोठी स्वप्ने आणि कुटुंबासाठी आधार शोधण्याच्या निमित्ताने ती मुंबईत आली होती. सुरुवातीला तिला लहान-मोठ्या भूमिका मिळाल्या मात्र प्रसिद्धी मिळाली नाही त्यानंतर ती बिग बॉस ओटीटीमध्ये दाखल झाली आणि त्यानंतर तिची चर्चा सुरू झाली. तिची आगळीवेगळी फॅशन ही सध्या सोशल मीडियात चर्चेत आले असून तिच्या या क्रिएटिविटीची देखील माध्यमात चर्चा सुरू आहे. तिची संपत्ती दीडशे कोटींपेक्षा अधिक असून प्रत्येक महिन्याला ती सुमारे 20 ते 50 लाख रुपये कमावते अशी देखील माहिती समोर येत आहे .