नगर हादरलं..अनैतिक संबंधातून विवाहितेचा खून केला आणि चक्क त्यानंतर..

शेअर करा

नगर जिल्ह्यात पाथर्डी तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आलेली असून अनैतिक संबंधातून एका विवाहीत महिलेचा गळा दाबून खून करण्यात आलेला आहे. तिचा खून केल्यानंतर तिचा मृतदेह उसाच्या शेतात टाकून जाळून टाकण्याचा प्रकार पाथर्डी तालुक्यातील वडगाव येथे उघडकीला आला आहे.

मयत महिलेच्या पतीच्या फिर्यादीवरून पोलिसांनी तिचा प्रियकर सोपान बापू भवार ( राहणार वडगाव ) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.

उपलब्ध माहितीनुसार, मयत महिलेचे गावातील सोपान याच्यासोबत अनैतिक संबंध होते. 24 तारखेला मयत महिलेच्या पतीला फोन आला की तुमच्या शेतातील ऊस पेटलेला आहे म्हणून ते तिथे गेले असता त्यांना चक्क त्यांच्या पत्नीचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळून आला आणि याच वेळी एक जणाने घटनेतील आरोपी सोपान हा घटनास्थळावरून दुचाकीवरुन जाताना दिसला अशी माहिती दिली.

घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जळीत महिलेचा मृतदेह नगर येथे शवविच्छेदनासाठी पाठवला. शवविच्छेदन अहवालात सदर महिलेचा गळा दाबून खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानंतर महिलेचे पती यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तिच्या प्रियकरावर खुनाचा गुन्हा आणि पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर प्रकरणी तपास सुरू असल्याचे समजते.


शेअर करा