नागपुर हादरवून टाकणाऱ्या ‘ त्या ‘ आजींच्या खुनाचे रहस्य उलगडले , आरोपी इतका जवळचा की ..

शेअर करा

नागपूर शहर हादरवून सोडणाऱ्या देवकाबाई बोबडे यांच्या हत्येच्या आरोपीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे या आजींचा खून चक्क त्यांच्या नातवानेच केल्याचे उघडकीस आली आहे. आरोपीचे इंजिनिअरिंगचे शिक्षण झाले असून उच्च शिक्षणासाठी आर्थिक बाबींमधून हा खून झाल्याचे समोर आले आहे . पोलिसांनी आरोपीस जेरबंद केले असून त्याने खुनाची कबुली दिली आहे मात्र हत्येमागचे कारण ऐकून पोलीस देखील चक्रावून गेले आहेत.

उपलब्ध माहितीनुसार, आरोपीने उच्च शिक्षणासाठी अमेरिकेमध्ये एका विद्यापीठात प्रवेश मिळवला होता मात्र त्या शिक्षणासाठी त्याला 1 कोटी 40 लाख रुपयांचा खर्च येणार होता. 40 लाख रुपयांचे कर्ज मंजूर झाले होते तर उर्वरित एक कोटी रुपये आजीने द्यावेत म्हणून तो तगादा लावत होता मात्र आजी नकार देत असल्याने त्यांच्यात भांडणे झाली होती. शनिवारी घटनेच्या दिवशी कपडे वाळत घालण्यावरून आजीची आणि नातवाची वादावादी झाली आणि आरोपीने त्यानंतर क्रूरपणे देवकाबाई बोबडे यांची हत्या केली.

आरोपीचे नाव मितेश पाचभाई असे असून मृतक आजींची मुलगी स्वतःच्याच घरी वरच्या माळ्यावर राहत होती. आजी स्वभावाने कडक असल्याने तिचे आणि नातवाचे फारसे पटत नव्हते त्यातच आरोपी आजींकडे अमेरिकेत शिक्षणाला जाण्यासाठी पैसे मागत होता.आरोपीने घटनेच्या दिवशी तात्कालीन कारणाने आजीसोबत वाद घातला आणि आजीची हत्या केली.

आजीची हत्या केल्यानंतर आपण हत्या केलीच नाही असा बनाव करण्यासाठी त्यानंतर तो नियमित जिमला देखील गेला आणि दैनंदिन दिनचर्येला लागला. मात्र सायंकाळी जेव्हा हत्याकांडाचा उलगडा झाला तेव्हा पोलिसांना आजी आणि नातू यांच्यातील मतभेदांबद्दल माहिती पडले आणि त्यांनी तो अँगल समोर ठेवत तपासाला सुरुवात केली आणि मीतेश पाचभाई याला अटक केली. आजीच्या या हत्याकांडात आणखी काही आरोपींचा सहभाग आहे का ? याचाही तपास पोलीस करत आहेत.


शेअर करा