नागपूर हादरलं.. ‘ माझ्या माहेरच्यांना कशाला बोलतो ‘ वरून सुरु झाला वाद अन ..

शेअर करा

महाराष्ट्रात एक धक्कादायक घटना समोर आलेली असून नागपूर जिल्ह्यात मानसिक कुचंबणा होत असलेल्या एका नवविवाहितेने विषाचा घोट घेऊन आत्महत्या केलेली आहे. शिवानी मोनू सनोडिया ( वय चोवीस ) असे तिचे नाव असल्याचे समजते. अवघ्या सहा महिन्यांपूर्वी तिचा विवाह झालेला होता

उपलब्ध माहितीनुसार, शिवशक्ती पारडी इथे शिवानी तिचा पती मोनू याच्या सोबत राहत होती. पुरेशी काळजी घेतली नाही म्हणून दोन महिन्यांपूर्वी तिचा गर्भपात झाल्याने ती नैराश्यात गेलेली होती आणि त्यातून ती अस्वस्थ देखील राहत होती. या अवस्थेत देखील पतीसोबत तिचे खटके उडत होते असेही समोर आले आहे. शनिवारी रात्री शिवानी तिच्या माहेरशी फोनवर बोलली.

शिवानी हिच्या माहेरच्यांनी तिचा पती मोनू याला तिची काळजी घेण्याची विनंती केली होती ते ऐकून मोनु याने सासरच्यांना खडे बोल सुनावले आणि आणि त्यानंतर शिवानी आणि त्यात पुन्हा वाद झाला. ‘ तुला जे काही बोलायचे आहे ते मला बोल माझ्या माहेरच्यांना कशाला बोलतो’ असे शिवानी त्याला म्हटली.

पती-पत्नीत वाद झाल्यानंतर शिवानीने मोनू झोपी गेल्यानंतर विषप्राशन केले. सकाळी तिला इस्पितळात नेले असता मृत घोषित करण्यात आले. मोनू इंद्र नारायण सनोडिया याने दिलेल्या तक्रारीवरून पारडी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून तपास सुरू असल्याचे समजते.


शेअर करा