नाशिकमधील चर्चमध्ये अचानकपणे धर्मगुरूकडून ‘ धक्कादायक ‘ प्रकार

शेअर करा

महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना उघडकीस येत असताना अशीच एक घटना नाशिक येथे उघडकीस आली आहे. ख्रिसमसचा सण हा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना नाशिक शहरातील एका चर्चमध्ये एका धर्मगुरूने चक्क स्वतःला वरिष्ठ धर्मगुरु असलेल्या फादरच्या जाचाला कंटाळून स्वतःला पेटवून घेतले आहे . आनंत पुष्पाकर आपटे ( वय 61 ) असे या धर्मगुरूचे नाव असून रविवारी शालिमार चर्चमध्ये प्रार्थना सुरू असतानाच हा प्रकार घडला आहे.

चर्चमध्ये रविवारी नेहमीप्रमाणे प्रार्थनेसाठी समाजबांधव एकत्र जमले होते. फादर शरद गायकवाड, फादर अनंत आपटे यांच्यासह विविध धर्मगुरू व चर्च कमिटीचे पदाधिकारी देखील उपस्थित होते. सर्व काही सुरळीत सुरू असतानाच अचानकपणे फादर आपटे यांनी स्वतःला पेटून घेतल्याने एकच खळबळ उडाली. समाज बांधवांनी तात्काळ त्यांना कार्पेट गुंडाळल्याने आग विझली मात्र आपटे हे कमरेपासून खाली 10 ते 15 टक्के भाजले आहेत. शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

फादर आनंत आपटे यांनी म्हटले आहे की, ‘ माझ्यावर मोठा अन्याय झालेला आहे. माझे मोठे धर्मगुरू शरद गायकवाड यांनी माझे म्हणणे ऐकून घेतले नाही. यापूर्वी मी वरिष्ठ धर्मगुरु गायकवाड यांना भेटून चर्चादेखील केली होती मात्र त्यांनी माझे म्हणणे न ऐकता तुला काय करायचे ते कर, ‘ असे म्हटले होते म्हणून मी स्वतःला पेटवून घेतले.


शेअर करा