नाशिकमधील दुहेरी हत्याकांड प्रकरणात ‘ त्या ‘ तिघांबाबत न्यायालय म्हणाले की ..

शेअर करा

नाशिक शहरासह संपूर्ण राज्यात गाजलेल्या मुक्त विद्यापीठाचे माजी कुलसचिव नानासाहेब कापडणीस आणि त्यांचा मुलगा डॉक्टर अमित कापडणीस यांच्या हत्याकांडप्रकरणी मुख्य संशयित असलेल्या राहुल जगताप याच्यासोबत असलेल्या तीन संशयित साथीदारांना जिल्हा आणि सत्र न्यायालयाने आणखीन पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. जगताप याला अटक करण्यात आल्यानंतर संशयित आरोपींनी इतर ठिकाणी पलायन केले होते मात्र पोलिसांनी त्यांना जेरबंद केले त्यानंतर सबळ पुराव्यांच्या आधारे पोलीस कोठडी वाढविण्याची मागणी न्यायालयाकडे करण्यात आली होती ती न्यायालयाने मंजूर केली.

संशयित जगताप याचे फरार असलेले वर्गमित्र प्रदीप शिरसाट ( वय 39 ) विकास हेमके ( वय 26 ) आणि सुरज मोरे ( वय 29 ) यांच्यासोबत संगनमत करत जगताप याने कापडणीस पिता-पुत्रांचा काटा काढला होता. सदर टोळीने दोन्ही मृतदेहांची विल्हेवाट लावली होती. चौकशीत महिंद्रा जीपमधून मृतदेह दोन वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये नेऊन खूनाचे पुरावे देखील नष्ट करण्याचा प्रयत्न यांनी केला होता. पोलिसांनी या तीनही संशयितांना औरंगाबादमधुन बेड्या ठोकल्या होत्या सहा दिवसांची त्याची पोलिस कोठडी संपल्यानंतर त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले असता आणखीन पाच दिवसांची पोलिस कोठडी वाढवण्यात आलेली आहे.

काय आहे प्रकरण ?

नाशिक येथील मुक्त विद्यापीठाचे माजी कुलसचिव नानासाहेब कापडणीस आणि त्यांचा पुत्र अमित कापडणीस यांची अमानुषपणे हत्या करण्यात आली होती. ती हत्या केल्यानंतर पुरावा मिटवण्याचा उद्देशाने आरोपी राहुल जगताप याने दोघांचेही मृतदेह वेगवेगळ्या जिल्ह्यात पेटवून दिल्याचे देखील समोर आले होते.

आरोपी राहुल जगताप हा नानासाहेब कापडणीस यांच्या पत्नीचा एकेकाळी विद्यार्थी असल्याची बाब समोर आलेली आहे. ज्यांच्याकडून शालेय जीवनात शिक्षणाचे धडे गिरवले त्यांच्याच पतीला आणि मुलाला संपत्तीच्या हव्यासापोटी या नराधमाने ठार मारलेले आहे. राहुल याने ओझर येथील एका खाजगी प्राथमिक शाळेत पाचवी ते दहावीपर्यंत शिक्षण घेतले असून कापडणीस यांच्या पत्नी या शाळेच्या तत्कालीन मुख्याध्यापिका होत्या. तब्बल पाच वर्षे त्यांनी राहुल याला आपल्या हाताखाली शिकवले मात्र त्याच नराधमाने आपल्या शिक्षिकेचे कुंकू पुसले .

कापडणीस यांचे चार फ्लॅट असून त्यांच्या समोरच्या इमारतीत राहुल हा त्याच्या परिवारासोबत राहत होता. कापडणीस पिता-पुत्र हे कोणाशी जास्त संपर्कात नसायचे. त्यांची पत्नी आणि मुलगी या मुंबईला राहायच्या त्यामुळे ते एकाकी आयुष्य जगत होते. त्याचा फायदा घेऊन राहुल याने त्यांच्याशी संपर्क वाढवला आणि त्यांच्या सर्व आर्थिक व्यवहाराची देखील माहिती काढत गेला.

कापडणीस यांचा पुत्र असलेला अमित याच्यासोबत त्याने मैत्री केली आणि आणि त्यांच्या सर्व संपत्तीची माहिती काढली आणि दोघांची हत्या केल्यानंतर बँकेची कागदपत्रे, मूळ कागदपत्रे, डेबिट कार्ड, पॅन कार्ड, चेक बुक आदी महत्वाची कागदपत्रे त्याने स्वतःकडे ठेवून घेतली. डिसेंबरमध्ये पिता पुत्राला एका आठवड्याच्या अंतराने त्याने ठार केले आणि दोन वेगवेगळ्या जिल्ह्यात मिळून मृतदेह कष्ट करत जाळून पुरावा नष्ट करण्याचाही प्रयत्न केला होता .


शेअर करा