नाशिकमध्ये प्रियकराच्या घरी प्रेयसी कुटुंबासह येऊन धडकली , गोरख आयसीयूमध्ये

शेअर करा

महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना समोर येत असताना अशीच एक घटना नाशिक जिल्ह्यात समोर आली होती. शुक्रवारी नाशिक जिल्ह्यातील लोहनेर येथे एका प्रेयसीने कुटुंबीयांच्या मदतीने चक्क आपल्या प्रियकराला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला होता. त्यांना न्यायालयात हजर केले असता 15 फेब्रुवारीपर्यंत त्यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. लोहनेर येथे ही घटना उघडकीला आली होती.

उपलब्ध माहितीनुसार,ती रावळगाव येथे राहात असून तिने लोहनेर येथे येऊन तिचा प्रियकर असलेला गोरख बच्छाव याच्या सोबत वाद घालत त्याच्या अंगावर पेट्रोल टाकून त्याला जाळण्याचा प्रयत्न केला होता त्यानंतर पोलिसांनी आरोपी युवती कल्याणी गोकुळ सोनवणे हिच्यासह गोकुळ तोंगल सोनवणे, निर्मला गोकुळ सोनवणे आणि तिचे दोन्ही भाऊ यांना ताब्यात घेतले होते.

गोरख बच्छाव हा काही वर्षांपूर्वी रावळगाव तालुका मालेगाव येथील सदर युवतीच्या संपर्कात आला आणि त्यांच्यामध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले त्यानंतर युवतीच्या घरच्यांनी तिचे लग्न दुसरीकडे ठरवले मात्र काही कारणांनी हे लग्न मोडले. सदर विवाह मोडण्या मागे गोरख याने काहीतरी केले असावे असा संशय मुलीच्या कुटुंबीयांना आला होता त्यानंतर मुलीचे कुटुंबीय लोहनेर येथे आले आणि त्याच्या डोक्यात लोखंडी सळईने वार करून मुलीने त्याच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले.

गोरख बच्छाव हा गंभीररीत्या भाजला असून नाशिक येथील सरकारी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. सुमारे 85 टक्के भाजलेला असल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते तर दुसरीकडे मुलीच्या घरून विरोध असल्याने आमचे संबंध खराब झाले होते असे गोरख बच्छाव यांचा भाऊ बाबाजी बच्छाव यांनी सांगितले आहे तसेच मुलीचे लग्न मोडल्यानंतर आमच्यासोबत हा प्रकार झाला असे बच्छाव यांच्या भावाचे देखील म्हणणे आहे .


शेअर करा