नाशिकमध्ये मेकअप क्लासच्या संचालकांकडून ‘ नको ते ‘ घडलंय ? , विवाहिता म्हणतेय की ..

शेअर करा

महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना समोर येत असताना अशीच एक घटना नाशिक येथे समोर आली असून एका महिलेला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर एका मेकअप क्लासेसच्या संचालकाने अत्याचार केल्याची बाब उघडकीला आली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, शहरातील प्रसिद्ध असलेल्या एका मेकअप क्लासचा चालक ललित निकम याने मे 2019 मध्ये कोल्ड्रिंक मधून गुंगीचे औषध देत पीडितेसोबत हे धक्कादायक कृत्य केले. गुरुवारी पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आलेली आहे.

पीडित महिलेच्या म्हणण्यानुसार, ‘ मे 2019 मध्ये पीडित महिलेला आरोपीने गुंगीचे औषध पाजून तिच्यावर अत्याचार केले आणि त्याचे फोटो काढत तिच्या पतीला देखील दाखवण्याची धमकी दिली. सतत अत्याचार केल्यानंतर पीडित महिला ही गर्भवती झाली आली आणि त्यानंतर संशयिताने तिचा गर्भपात देखील करून घेतला ‘.

संशयित व्यक्तीसह त्याची पत्नी नेहा निकम, मित्र जय वाघ आणि त्याची पत्नी ज्योती वाघ यांनी देखील हा गर्भपात घडवून आणण्यासाठी धमकावले असल्याचे पीडित महिलेचे म्हणणे आहे. पीडितेने गंगापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी ललित निकम याला अटक केली आहे.


शेअर करा