नाशिक हादरले..’ श्रद्धांजली वाहण्यासाठी माझे चांगले फोटो स्टेटसला ठेवा ‘

शेअर करा

महाराष्ट्रात शुल्लक कारणावरून तरुण देखील टोकाची भूमिका घेत असल्याचे अनेक प्रकार याआधी उघडकीस आले आहेत. नाशिक इथे अशीच एक घटना उघडकीस आली असून सिन्नर येथील एका युवकाने सोशल मीडियावर भावनिक संदेश लिहून आत्महत्या केली आहे. विशाल उत्तम शिंदे (वय २२ ) असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव असून तो नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील रहिवासी आहे. मृत तरुणाने शुक्रवारी सोशल मीडियावर आपल्या मित्रांना उद्देशून भावनिक संदेश स्टेटसला ठेवून आत्महत्या केली आहे.

मृत विशाल याने स्टेटसला आपल्या मित्रांवर खूप प्रेम असल्याचं म्हटलं आहे. तसेच ‘ मी कोणाला दुखावलं असेल तर राग मनावर घेऊ नका. सगळे आनंदाने राहा. माझ्या मृत्यूनंतर भावपूर्व श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्वांनी माझे चांगले फोटो तुमच्या स्टेटसला ठेवा ‘ असंही त्यानं आपल्या स्टेटसमध्ये लिहिलं आहे. तरुणानं राहत्या घरात गळफास घेत आयुष्याचा शेवट केला अद्यापपर्यंत त्यामागचे कारण समोर आलेले नाही .

मृत विशालचं स्टेटस पाहून अनेकांनी त्याला समजावून सांगण्यासाठी फोन केला. पण तोपर्यंत फार उशीर झाला होता.घटनेची माहिती मिळाल्यानंतर, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. 22 वर्षीय विशालने नेमक्या कोणत्या कारणातून आत्महत्या केली? हे अद्याप स्पष्ट झालं नसून पोलीस नेमक्या कारणाचा शोध घेत आहेत. या घटनेचा अधिक तपास ठाणगाव पोलीस करत आहेत.


शेअर करा