पंजाबच्या ‘ त्या ‘ प्रकरणात आतापर्यंत आठ तरुणींनी केला आत्महत्येचा प्रयत्न

शेअर करा

देशात एक अत्यंत खळबळजनक अशी घटना पंजाबच्या मोहाली येथे समोर आली असून चंडीगड विद्यापीठाच्या वसतीगृहात राहत असलेल्या मुलींचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणी एका विद्यार्थिनीला अटक करण्यात आलेले असून ती प्रथम वर्षात शिकत आहे. तिने वसतीगृहातील मुलींचे चोरून व्हिडिओ काढले आणि ते सिमला येथील तिच्या मित्राला पाठवलेले होते. पोलिसांचे एक पथक या तरुणीच्या मित्राला पकडण्यासाठी शिमला येथे दाखल झालेले आहे.

मुख्यमंत्री भगवंत मान यांनी यासंदर्भात चौकशीचे आदेश दिले असून आपले व्हिडिओ व्हायरल होण्याच्या भीतीने आत्तापर्यंत आठ विद्यार्थिनींनी चक्क आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे. सदर तरुणीबद्दल इतर काही विद्यार्थिनींना शंका होती म्हणून त्यांनी तिच्यावर पाळत ठेवून तिला रंगेहात पकडले आणि ही माहिती विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांना दिली. आत्तापर्यंत तब्बल 60 विद्यार्थिनींचे व्हिडिओ तिने मोबाईल मध्ये शूट केलेले आहे.

चंदीगड विद्यापीठात सध्या तणावाचे वातावरण निर्माण झाले असून आरोपी मुलीने सिमला येथील तिच्या मित्राला जो व्हिडिओ पाठवला तो तिचा स्वतःचा आहे . तिला अटक केल्यानंतर दोघांना समोरासमोर बसवून चौकशी केली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. राष्ट्रीय महिला आयोगाने या प्रकरणाची तात्काळ दखल घेतली असून गुन्हेगारांवर एफआयआर दाखल करण्याचे आदेश आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी दिलेले आहेत. अरविंद केजरीवाल यांनी देखील ही घटना धक्कादायक आणि लज्जास्पद असल्याचे सांगितले आहे. काँग्रेसकडून देखील सदर प्रकरणी सखोल चौकशी करण्यात येऊन दोषी व्यक्तींना कठोर शासन करण्यात यावे अशी भूमिका स्पष्ट करण्यात आलेली आहे.


शेअर करा