पतीच्या मृतदेहसमोरच प्रियकरासोबत ‘ नको तो ‘ प्रकार केला , पोलिसांना म्हणतेय की ..

शेअर करा

देशात अनेक धक्कादायक घटना उघडकीस येत असून अशीच एक घटना मध्य प्रदेशात समोर आली आहे. एका पत्नीने तिच्या बाहेरील अफेअरमुळे स्वत:च्या पतीची हत्या केली मात्र तिने रचलेला बनाव पोलिसांच्या अवघ्या काही क्षणातच लक्षात आला आणि तिला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. आपल्या बॉयफ्रेंडसोबत मिळून तिने हे कृत्य केलं होत मात्र घरात एका तुटलेल्या मोबाइल फोनवरुन संशय आला आणि पोलिसांना सर्व खेळ लक्षात आला .

मध्यप्रदेशातील राजगढ जिल्ह्यात रामदिनेश मीणा ( वय ३० ) याची त्याच्यात घरात हत्या झाली होती. ज्यादिवशी रामदिनेशची हत्या झाली त्यादिवशी त्याच घरात त्याची पत्नी ज्योती ही गाढ झोपली होती. घरात पतीची हत्या झाली असताना पत्नीला याबाबत काहीही माहित न पडणं हीच बाब पोलिसांना खटकली आणि त्यांनी तपास सुरु केला असताना चक्क त्या रात्री तिचा प्रियकर तिथे आला असल्याची देखील माहिती समोर आली आणि पोलिसांनी तिला ताब्यात घेतले.

आरोपी महिला ज्योती मीणाने खुनाची कबुली देत सांगितले की, तिचे गावात राहणाऱ्या चैनसिंह लोधाशी तिचे प्रेमसंबंध होते आणि तिच्या प्रियकराने एक फोन तिला घेऊन दिला होता. त्याच फोनवरुन ती त्याच्याशी बोलत होती. एक दिवस पतीने तिला मोबाइलवर बोलताना पाहिलं आणि मोबाइल रागात फोडला सदर घटना महिलेने तिच्या प्रियकराला सांगितली तर त्याने लगेच बोलण्यात अडथळा नको म्हणून आणखी एक नवा फोन तिला घेऊन दिला मात्र त्यानंतर दोघांनी मिळून पतीच्या हत्येचा कट रचला.

21-22 जानेवारीच्या रात्री पती झोपला असताना ज्योती आपल्या दोन मुलांना घेऊन वरच्या खोलीत झोपली होती. त्याच रात्री तिने प्रियकराला आपल्या घरी बोलवलं आणि दांड्याने पतीच्या डोक्यात वार करत हत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे पतीच्या मृतदेहासमोर दोघांनी शारीरिक संबंध देखील ठेवले आणि सकाळी तो निघून गेला मात्र पोलीस आल्यावर तपासात एक फुटका मोबाईल सापडला आणि प्रकरणाला वाचा फुटली. आरोपी महिला ज्योती मीणा आणि तिचा प्रियकर चैनसिंह लोधा याला अटक केली असून तपास सुरु आहे .


शेअर करा