
महाराष्ट्रात एक धक्कादायक घटना समोर आलेली असून कोल्हापूर येथे मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असताना सदर प्रकाराची पोलिसांना कुणकुण लागली आणि त्यांनी छापा टाकून एका महिलेसह दोन जणांना अटक केली आहे. शाहूपुरी पोलिसांनी ही कामगिरी केली असून परमेश्वर गणपती सूर्यवंशी ( वय 55 ) आणि ज्योती मारुती मिसाळ ( वय 28 राहणार पुलाची शिरोली हातकणंगले ) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निंबाळकर कॉलनी गुरुकृपा अपार्टमेंटमध्ये ज्योती मिसाळ आणि परमेश्वर सूर्यवंशी या दोन जणांनी भागीदारीमध्ये गुडलक मसाज सेंटर सुरू केले होते. सुरुवातीला या मसाज सेंटरला अपेक्षित आता असा प्रतिसाद आला नाही म्हणून आणि अधिक पैसा कमावण्याच्या उद्देशाने या मसाज सेंटरमध्ये पीडित महिला ठेवून वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती शाहूपुरी पोलिसांना हाती लागली होती.
गुप्त सूत्रांच्या माध्यमातून ही माहिती समजताच पोलिसांनी पूर्णपणे फिल्डिंग लावून तिथे छापा टाकला त्यावेळी आरोपी हे तिथे पीडित महिलेसोबत आढळून आले आणि त्यांना तात्काळ बेड्या ठोकण्यात आल्या. मसाज सेंटरचा मालक परमेश्वर सूर्यवंशी आणि ज्योती मिसाळ यांना 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. शहर पोलिस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली राजेश गवळी आणि महिला पोलीस शिल्पा आडके यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.