पाच बिबट्यांचा जीव घेतल्याप्रकरणी न्यायालय शेतकऱ्याला म्हणाले..

शेअर करा

महाराष्ट्राला उत्तम अशी वन आणि प्राणीसंपदा लाभलेली आहे मात्र अनेकदा माणूस विवेक गमावून वनसंपदा आणि प्राणी पक्षी यांच्या जीविताशी खेळ करतो अशीच एक घटना औरंगाबाद जिल्ह्यात समोर आलेली असून एका व्यक्तीला विषप्रयोग करून पाच बिबट्यांची हत्या केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.

ज्ञानेश्वर नंदलाल परदेशी ( राहणार पिंपरी माळेगाव तालुका सोयगाव ) असे याचे नाव असून सत्र न्यायाधीश डॉक्टर एम एस देशपांडे यांनी त्यांचा जामीन अर्ज नामंजूर केला आहे. जरंडी शिवारात शेतकरी असलेला ज्ञानेश्वर परदेशी याच्या बकरीचे पिल्लू बिबट्याने मारले होते त्यामुळे मामा बाबूसिंग परदेशी आणि ज्ञानेश्वर यांनी बकरीच्या पिलावर विष टाकले आणि ते मांस खाल्ल्यामुळे 23 फेब्रुवारीला बिबट्या तर 25 फेब्रुवारीला मादी बिबट्या यांचा मृत्यू झाला. आईचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या गर्भाशयात पूर्ण वाढ झालेली जवळपास तीन पिले देखील आढळून आली होती त्यामुळे या घटनेविषयी परिसरात देखील संताप व्यक्त केला जात होता.

ज्ञानेश्वर यांच्या जामीन अर्जाला विरोध करताना बिबट्या हा वन्य प्राणी अनुसूची क्रमांक 1 मधील असून वन्यजीव कायद्याच्या तरतुदीनुसार अनुसूची 1 मधील प्राण्यांची शिकार अवैध असून सदर प्रकरणी तीन ते सात वर्षांची शिक्षा आणि दहा हजार रुपयापर्यंत दंडाची शिक्षा अशी तरतूद असल्याचे सहाय्यक लोक अभियोक्ता यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले होते त्यानंतर न्यायालयाने आरोपी याचा जामीन अर्ज नामंजूर केला.


शेअर करा