पाटबंधारे विभागात चांगली ‘ मोठी ‘ ओळख म्हणत जाळ्यात ओढले अन ..

शेअर करा

देशातील खाजगी नोकऱ्यांमध्ये सुरक्षितता पहिल्यासारखी राहिली नाही म्हणून अनेक लोक सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्नशील असतात मात्र यातूनच फसवेगिरीचे देखील प्रकार समोर येत असून अशीच एक घटना सोलापूर जिल्ह्यात उघडकीला आली आहे. पाटबंधारे विभागात चांगली ओळख आहे असे सांगून तिथे नोकरी लावण्याचे आमिष दाखवत एक लाख 75 हजार रुपयांना फसवल्याप्रकरणी दोन भावांच्या विरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अनंत सर्वगोड आणि महेश सर्वगोड ( दोघेही राहणार सोलापूर ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

उपलब्ध माहितीनुसार, मच्छिंद्र नागनाथ घोडके ( वय 28 राहणार मद्रे तालुका दक्षिण सोलापूर ) आणि आरोपी अनंत सर्वगोड हे दोघे एका कंपनीत नोकरीला होते यावेळी अनंत सर्वगोडचा भाऊ महेश हा कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करत होता. जिल्हा परिषद आणि उजनी पाटबंधारे विभागात आपली चांगली ओळख आहे असे सांगत त्यांनी फिर्यादी यांना आपल्या जाळ्यात ओढले.

आपल्या ओळखीने उजनी पाटबंधारे विभागात नोकरीला लावतो असे आमिष दाखवून त्याने मच्छिंद्र घोडके यांच्याकडून वेळोवेळी करत एक लाख 75 हजार रुपये घेतले. दरम्यानच्या काळात नोकरीचे नियुक्तीपत्र प्राप्त झाल्यावर उर्वरित तीन लाख रुपये देण्याचे ठरले होते मात्र एक लाख 75 हजार रुपये मिळाले आणि त्यानंतर उडवाउडवीची उत्तरे देण्यास महेश याने सुरुवात केली. आपली फसवणूक झाल्याची जाणीव झाल्यावर घोडके यांनी पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली असून पोलिस उपनिरीक्षक गायकवाड पुढील तपास करत आहे.


शेअर करा