पिंपरीत महिलेच्या सेफ्टी डोअरवर मोबाईल नंबर चिटकवला , आरोपीचे वय ऐकाल तर..

शेअर करा

शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून महिलांच्या छळाचे प्रकार वाढलेले पाहायला मिळत असून असाच एक प्रकार पिंपरीत समोर आलेला आहे . एक महिला घरात एकटी असताना तिच्या घराच्या बाहेर घराच्या खिडकीबाहेर उभे राहून अश्लील हावभाव केले तसेच स्वतःचा मोबाईल नंबर चिट्ठीवर लिहून ती चिठ्ठी महिलेच्या सेफ्टी डोअरवर चिटकवली असा प्रकार समोर आलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार गेल्या सात ते आठ महिन्यांपासून हा प्रकार घडत होता. दापोडी येथील हे प्रकरण असून भोसरी पोलीस ठाण्यात महिलेने सदर प्रकरणातील आरोपी राजेश वेलीपुरम भार्गवत ( वय 57 ) याच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे. महिलेच्या म्हणण्याप्रमाणे आरोपीने अश्लील हावभाव केलेले असून दहा तारखेला सकाळी आठच्या सुमारास स्वतःचा मोबाईल नंबर लिहून त्याने फिर्यादी महिला यांच्या दरवाजावर चिटकवलेला होता हा प्रकार लक्षात आल्यानंतर पीडित महिलेने पोलिसात धाव घेतलेली आहे .


शेअर करा