‘ पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा ‘ , पुण्यात साठ वर्षीय व्यक्तीकडून महिलेला शेरेबाजी

शेअर करा

पुण्यात एक वेगळाच प्रकार समोर आलेला असून विकृतीला वय नसते असे या घटनेतून समोर आलेले आहे. चक्क साठ वर्षाच्या ज्येष्ठ व्यक्तीने 51 वर्षीय महिलेची छेडछाड केल्याचा प्रकार पुण्यात समोर आलेला आहे. येरवडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आरोपीचे वय हे 60 वर्ष असून पीडित महिलेने त्याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, संशयित व्यक्तीला दारूचे व्यसन असून दोन्ही कुटुंबात पुर्वीपासुन वाद आहे. 22 ऑगस्ट रोजी संशयित आरोपी हा फिर्यादी महिलेच्या घरासमोर आला होता आणि त्याने फिल्मी स्टाईलमध्ये महिलेला ‘ तू खूप सुंदर दिसतेस.. मला खूप आवडतेस आपण दोघे फिरायला जाऊ ‘ असे म्हणत तिला प्रपोज केले आणि अश्लील हावभाव करून आपण मज्जा करू असे म्हणून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले आणि त्यानंतर तिचा विरोध असल्याचे लक्षात आल्यावर त्याने तिला शिवीगाळ केली.

फिर्यादी महिलेने त्याला ‘ तुम्ही तुमच्या घरात झोपा मला त्रास देऊ नका ‘ असे म्हटल्यानंतर त्याने तिला शिव्या दिल्या आणि त्यानंतर तिला जोरजोरात ऐकू जाईल अशा स्वरूपात ‘ पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा ‘ असे म्हणून तिचा विनयभंग केला असे महिलेचे म्हणणे आहे. सदर प्रकरणी दोघांमध्ये जागेचा वाद असून न्यायालयात प्रकरण सुरू असल्याची देखील प्राथमिक माहिती आहे.


शेअर करा