‘ पुढच्या वेळी देवा एकाच जातीत जन्म द्या ‘ , प्रेमी युगुलाने घेतले विष

शेअर करा

देशाला स्वातंत्र्य मिळून कित्येक वर्षे उलटली तरी जातीधर्माचा पगडा सर्वच समाजावर मोठ्या प्रमाणात आहे . विरुद्ध जातीच्या अथवा धर्माच्या व्यक्तीसोबत जर प्रेमसंबंध जुळले तर होणाऱ्या परिणामाची कल्पनाही करवत नाही असेच एक प्रकरण सध्या हरियाणातील सिरसा जिल्ह्यात समोर आलेले असून एका तरुण तरुणीने रविवारी रात्री आत्महत्या केलेली आहे. त्यावेळी सुसाईड नोटमध्ये त्यांनी ‘ पुढच्या वेळी देवा आम्हाला एकाच जातीत जन्म द्या ‘ असे म्हटलेले आहे.

उपलब्ध माहितीनुसार, मयत तरुणीचे नाव निसा असे असून तिचा प्रियकर असलेला अरुणकुमार हा जाट समाजातून येतो तर निसा ही मुस्लिम समाजातील आहे. तिचे वय 23 वर्ष असून तिच्या प्रियकराचे वय 25 वर्ष आहे. त्यांचे प्रेमप्रकरण सुरू झाल्यानंतर अरुणकुमार याचा मामा ओमप्रकाश फौजी आणि मामेभाऊ रामकुमार हे त्याला या मुलीपासून दूर राहण्याचा सल्ला देत होते जर तू निसा हिच्यासोबत लग्न केले तर तुला जिवंत ठेवणार नाही, ‘ अशी देखील त्यांनी धमकी दिली असे मृत्यूपूर्व त्यांनी लिहलेल्या सुसाईड नोटमध्ये म्हटलेले आहे.

रात्री उशिरा अरुण कुमार आणि निसा हे नवीन धान्य मार्केटमध्ये मयत अवस्थेत आढळून आलेले होते. त्यांनी विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांना समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली त्यावेळी दोन्ही व्यक्तींच्या घरातून नातेवाईक तिथे पोहोचलेले होते. तरुणाच्या हातावर आत्महत्येचे कारण लिहिले होते त्यामध्ये, ‘ पुढच्या वेळी देवा एकाच जातीत आम्हाला जन्म द्या. मी आणि निसा एकमेकांवर खूप प्रेम करतो मात्र माझे मामा ओमप्रकाश फौजी आणि मामाचा मुलगा रामकुमार हे आमच्या लग्नाला विरोध करत होते. जर आम्ही लग्न केले तर मारून टाकण्याची धमकी देत होते. आमच्या मृत्यूला हे दोघे जबाबदार आहेत असे लिहिलेले होते. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केलेला असून तपासाला सुरुवात केली आहे .


शेअर करा