पुणे ब्रेकिंग.. अखेर तिने उडी घेतलीच मात्र त्यानंतर

शेअर करा

पुणे शहरात एक महिला कौटुंबिक वादातून आत्महत्या करण्यासाठी निघाली. सिंहगड रस्त्यावरील तुकाई नगर येथे अनेक नागरिक उपस्थित असताना ती डोहात उडी मारण्याची धमकी देत होती. नागरिकांनी तिला समजवण्याचा प्रयत्न केला मात्र तिने दाद दिली नाही आणि कालव्यात उडी मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला मात्र तात्काळ दोन पोलिसांनी आणि नागरिकांनी तिला वाचवले .

महिलेने कॅनॉलमध्ये उडी मारल्यानंतर एका पोलिसांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता स्वतः पाण्यात उडी मारून महिलेचे प्राण वाचवले. सिंहगड पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक शैलेश नेहरकर आणि पोलीस शिपाई लक्ष्मण काशीद अशी या धाडसी पोलिसांची नावे आहेत .

27 वर्षाची महिला आणि तिच्या पतीचे भांडण झाले होते त्यातून ती कॅनॉलच्या पाण्यात उडी मारुन आत्महत्या करणाऱ्या इराद्याने घरातून निघाली होती . परिसरातील नागरिकांनी याची माहिती नियंत्रण कक्षाला दिली आणि सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे लक्ष्मण काशिद आणि शैलेश नेहरकर यांनी घटनास्थळी धाव घेतली.

दोन्ही पोलिस कर्मचारी पोहोचले त्यावेळी ती महिला कॅनॉल समोर उभे राहून आत्महत्या करण्याची धमकी देत होती. त्यांनी तिला खूप समजावण्याचा प्रयत्न केला मात्र तिने ऐकले नाही आणि अखेर तिने पाण्यात उडी मारली त्यानंतर एका पोलीस कर्मचाऱ्यांनी तात्काळ पाण्यात उडी मारून तिला वाचवत बाहेर आणले. सदर प्रकरणी अग्निशामक दलाची देखील मदत मागवण्यात आली होती.


शेअर करा