पुणे ब्रेकिंग..ऑन ड्युटी असतानाच पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

शेअर करा

महाराष्ट्रात पोलीस दलावर असलेला तणाव हा काही लपून राहिलेला नाही त्यातून आत्महत्या देखील घडल्याच्या अनेक घटना समोर आलेल्या आहेत तर सतत होत असलेल्या मानसिक त्रासाने पोलीस दलातील कर्मचाऱ्यांचे देखील शारीरिक स्वास्थ्य बिघडत आहे. अशीच एक घटना पुणे शहरानजीक पिंपरी येथे समोर आलेली असून ऑन ड्युटी असताना अस्वस्थ वाटायला लागल्यानंतर एका पोलीस कर्मचाऱ्याची तब्येत बिघडली आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र दुर्दैवाने उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला

उपलब्ध माहितीनुसार शिरगाव पोलीस चौकी रविवारी दुपारी ही घटना घडलेली असून पोलीस नाईक असलेले दिलीप दत्तराव बोरकर ( वय 36 ) असे मयत कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्यांच्या पाठीमागे आई आई वडील पत्नी आणि दोन मुली असा परिवार असून सदर घटनेविषयी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे


शेअर करा