पुणे ब्रेकिंग..दहा वर्षांनी ब्रेकअप केलं म्हणून प्रियकर बिअरची बाटली घेऊन मागे लागला

शेअर करा

पुणे शहरानजीक एक वेगळीच घटना समोर आलेले असून सुमारे दहा वर्षांपासून असलेले प्रेमसंबंध दोघांमध्ये भांडण झाल्यानंतर तुटले त्यानंतर पीडित तरुणीने त्या व्यक्तीशी बोलणे बंद करून टाकले त्याचा राग येऊन तिला जीवे मारण्याच्या उद्देशाने प्रियकर बियरची रिकामी बाटली घेऊन तिच्या अंगावर धावत असताना आईमध्ये पडली म्हणून आईच्या तोंडावर आणि डोक्यात बाटली लागल्याने आई गंभीर जखमी झालेली आहे.

पीडित तरुणीच्या जखमी आईने यासंदर्भात फिर्याद दिली असून, दीपक मनोहर शितोळे ( वय 32 राहणार इंदिरानगर थेऊर तालुका हवेली ) याला बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत. पीडित तरुणी आणि तिचा मित्र दीपक यांचे दहा वर्षांपासून प्रेमसंबंध होते. 27 मार्च रोजी दोघांमध्ये भांडण झाल्यानंतर ती त्याच्याशी बोलत नव्हती.

तो वारंवार तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करायचा मात्र ती प्रतिसाद देत नसल्याने तरुणाने अखेर तिला धडा शिकवायचा निर्णय घेतला. चार एप्रिल रोजी पीडिता तिची आई आणि आजी घरासमोरील ओट्यावर गप्पा मारत बसलेले असताना पहाटे दोनच्या सुमारास दिपक शितोळे तिथे आला.

त्याने शिवीगाळ करत तू माझा फोन का उचलत नाहीस.. आता जाशील कुठे ? असे म्हणाला. आईने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने पीडित तरुणीच्या आईला देखील शिवीगाळ केली तिथे जवळच बिअरची एक रिकामी बाटली पडलेली होती. ती घेऊन तो तरुण तिच्या अंगावर धावून गेला मात्र आई मध्ये पडली त्यावेळी त्याने ती बाटली आईच्या तोंडावर आणि डोक्यात मारली . त्यात पीडित तरुणीची आई जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू असल्याचे समजते.


शेअर करा