पुणे ब्रेकिंग..दुसऱ्या लग्नाची गोष्ट फसली अन पतीने केला खून , न्यायालय म्हणाले ..

शेअर करा

पुणे जिल्ह्यात एक खळबळजनक घटना 2015 साली घडली होती. पतीसह सासरची मंडळी सतत त्रास देत असल्याने विवाहित महिलेने पहिल्या लग्नात घटस्फोट घेतला होता मात्र दुसरे लग्न देखील तिचे यशस्वी झालं नाही. त्याच्यासोबत देखील महिलेचे वाद सुरू झाल्यानंतर महिलेच्या दुसऱ्या पतीने ती झोपेत असतानाच तिच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून देत तिचा खून केलेला होता. या आरोपी पतीला न्यायालयाने जन्मठेप सुनावली असून न्यायाधीश पत्रावळी यांनी हा निकाल दिलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, गणेश शंकर पासलकर असे आरोपी पतीचे नाव असून पुरंदर तालुक्यातील भिवरी येथे 19 सप्टेंबर 2015 रोजी ही घटना घडली होती. मनीषा पासलकर ( वय वीस ) असे या महिलेचे नाव असून मृत्यूपूर्व दिलेला जबाब हा मोठा पुरावा प्रकरणात समोर आला. गुन्हा सिद्ध करण्यासाठी सरकारी वकील सुनील हांडे यांनी तब्बल 9 साक्षीदार तपासले. संपूर्ण खटला हा मृत्यूपूर्व जबाब यावर आधारित होता त्यानंतर न्यायालयाने आपला निर्णय दिलेला असून पिडीत कुटुंबाला अखेर न्याय मिळालेला आहे.


शेअर करा