पुणे ब्रेकिंग..लहानपासूनच्या मैत्रीचा लॉजवर शेवट , आता प्रकरण पोलिसात

शेअर करा

पुणे शहरात धक्कादायक घटना उघडकीला आली असून लहानपणापासून ओळखत असलेल्या एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणाने वारंवार तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले मात्र त्यानंतर त्याने तिला शिवीगाळ तसेच मारहाण करत लग्नाला नकार दिला. पीडित तरुणीने आपल्या सोबत घडलेल्या या धक्कादायक प्रकारानंतर तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. चर्होली, भोसरी आणि इतरही अनेक ठिकाणी 28 फेब्रुवारी 2020 ते 16 जून 2021 पर्यंत त्याने आपल्यावर ठिकठिकाणी अत्याचार केले असे पीडित तरुणीचे म्हणणे आहे.

पीडित तरुणीच्या म्हणण्यानुसार, तिची आणि आरोपीची लहानपणापासून ओळख आहे. पीडित तरुणी चे वय 23 वर्ष असून तिने रविवारी दहा तारखेला भोसरी पोलीस ठाण्यात आरोपीच्या विरोधात फिर्याद दिलेली आहे. विकास सुरेश साके ( वय 28 राहणार शास्त्री नगर आळंदी रोड भोसरी ) असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी तरुण तरुणीच्या नात्यातील असून लहानपणापासून दोघेही एकमेकांच्या ओळखीचे आहेत. त्यातून पुढे त्यांच्यात प्रेमप्रकरण सुरू झाले मात्र त्याने तिच्यावर शारीरिक अत्याचार केल्यानंतर लग्नाला नकार दिला म्हणून पीडित तरुणीला फसवणुकीची भावना झाली आणि तिने पोलीस ठाण्यात धाव घेतली.


शेअर करा