पुणे विमानतळावर काश्मीरी तरुणाच्या ‘ त्या ‘ प्रश्नाने उडाला गोंधळ अन तपासणी सुरु

शेअर करा

महाराष्ट्रात अनेक वेगवेगळ्या घटना समोर येत असून अशीच एक घटना पुणे विमानतळावर घडलेली आहे. लोहगाव येथील विमानतळावर प्रवाशांच्या सामानाची तपासणी करताना एका मूळच्या काश्मिरच्या 21 वर्षीय तरुणाने ‘ माझी बॅग वारंवार का चेक करत आहात माझ्या बॅगमध्ये बॉम्ब आहे का ? ‘, असे म्हटल्याने तिथे एकच गोंधळ उडाला. पोलिसांनी विनाकारण अफवा पसरवल्याबद्दल त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. समीरण विजय अंबुरे ( वय 20 राहणार धानोरी ) यांनी विमानतळ पोलिस ठाण्यात या संदर्भात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर तरुण हा मूळचा काश्मीरचा राहणारा असून सध्या तो भूगाव येथे विधी महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. गो एअरने तो दिल्लीला जाणार होता त्यासाठी 13 जानेवारी रोजी तो विमानतळावर आला होता. त्याच्या बॅगेची तपासणी करण्यात आली त्यानंतर पुन्हा सेकंडरी पॉईंटवर बॅगेची तपासणी करण्यात आल्यानंतर त्याने उद्धटपणे असा प्रश्न विचारला.

काउंटरवर वरील तरुणीला रागाने बोलताना, ‘ माझी बँक वारंवार का चेक करत आहात माझ्या बॅगेत बॉम्ब आहे का ? ‘, असा प्रश्न त्याने विचारला. समोरील तरुणी त्याच्या या प्रश्नानंतर भांबावून गेली आणि तिने सर्वांना अलर्ट केले. तरुणाकडे असलेल्या बॅगेची पुन्हा तपासणी करण्यात आली मात्र सुदैवाने त्यात काही आढळून आले नाही.


शेअर करा