
पुणे जिल्ह्यात एक खळबळजनक घटना समोर आलेली असून हवेली तालुक्यातील कदमवाकवस्ती इथे कवडीमाळवाडी परिसरात पुणे शहर पोलिस दलात कर्तव्य बजावत असलेले पोलीस कर्मचारी यांनी 28 जुलै रोजी सकाळी अकराच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सुनील नारायण शिंदे ( 48 राहणार कवडीमाळवाडी तालुका हवेली ) असे त्यांचे नाव असून ते पुणे पोलीस आयुक्तालयात शिवाजीनगर पोलीस स्टेशनला कार्यरत होते
सुनील शिंदे हे बुधवारी संध्याकाळी एका खोलीत झोपले होते मात्र गुरुवारी सकाळी ते दरवाजा उघडत नसल्याने घरच्यांनी आवाज दिल्यावर खोलीतून कुठलाही प्रतिसाद आला नाही म्हणून खिडकीतून त्यांनी पाहिले असताना त्यांनी पंख्याला खिडकीच्या पडद्याने गळफास लावून आत्महत्या केली होती. घटनास्थळी लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अमोल घोडके, पोलीस हवालदार भोसले यांनी तात्काळ धाव घेतली असून पोलीस प्रकरणाचा तपास करत आहे.