पुणे हादरलं.. क्राइम पेट्रोल पाहून बनवला प्लॅन आणि ..

शेअर करा

पुणे जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आलेली असून क्राइम पेट्रोल मालिका पाहून एका व्यक्तीने एका महिलेचा खून केला आणि तिचे दागिने चोरून नेले मात्र पोलिसांनी अवघ्या दहा तासात त्याला बेड्या ठोकलेल्या आहेत .

उपलब्ध माहितीनुसार , किसन सिताराम जगताप ( वय 46 राहणार नारळीचा मळा तालुका पुरंदर जिल्हा पुणे ) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव असून त्याने सुनिता बाळू कदम ( वय 44 राहणार वैदुवाडी हडपसर ) या महिलेचा खून केला होता.

सुनीता कदम या आपली मुलगी आणि जावई यांच्यासह वैदुवाडी इथे राहत होत्या. कोणीतरी त्यांचा खून केला असून दागिने मोबाईल आणि एटीएम असे चोरून नेत 46 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरला असे रविवारी सकाळी आढळून आले. गुन्हे शाखेच्या युनिट 54 पोलीस अंमलदारांना परिसरात एक संशयित आढळून आला आणि त्याच्याकडे सुनीता कदम यांचा मोबाईल आढळून आला त्यानंतर त्यांनी चौकशी करत त्याला पुरंदर येथून ताब्यात घेतले आहे .


शेअर करा