पुणे हादरलं..थेरगावमध्ये सावत्र आईचे भयानक कृत्य समोर

शेअर करा

पुण्यात एक खळबळजनक असे प्रकरण सध्या पिंपरीत समोर आलेले असून घरातील संपलेल्या साहित्याबद्दल तू मला का सांगितले नाही असे म्हणत चिडलेल्या सावत्र आईने तेरा वर्षांच्या मुलीला लाकडी बांबूने मारहाण केली . सावत्र आईने केलेल्या मारहाणीत ही मुलगी गंभीर जखमी झालेली होती मात्र अखेर तिचा मृत्यू झालेला आहे. 14 तारखेला थेरगाव येथे दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडलेली आहे

उपलब्ध माहितीनुसार , घरातील साहित्य संपल्यानंतर तू अगोदरच मला का सांगितले नाही या कारणावरून आरोपी महिलेने तेरा वर्षांच्या मुलीला मारहाण केलेली होती. या मारहाणीत तिच्या पायाला पाठीला आणि डोक्याला मार लागल्यानंतर ती गंभीर जखमी झालेली होती. तिला रुग्णालयात दाखल केल्यानंतर आरोपीने तिच्या मृत्यूबाबत खोटी माहिती पोलिसांना दिली मात्र पोलिसांनी अधिक तपास अधिक चौकशी केली त्यावेळी हा प्रकार समोर आलेला आहे . सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी ठाकूर यांनी वाकड पोलिसात महिलेच्या विरोधात फिर्याद दिलेली आहे.


शेअर करा