
पुणे जिल्ह्यातील जमिनीचे भाव मोठ्या प्रमाणात वाढलेले असल्याने या क्षेत्रात गुन्हेगारीचा मोठ्या प्रमाणात शिरकाव झालेला दिसून येत आहे . पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुका हा त्यात आतापर्यंत शांत समजला जातो मात्र आता इथेही गुन्हेगारीने शिरकाव केलेला दिसत असून तोरणागडाच्या पायथ्याशी वेल्हे तालुक्यात एका व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, नवनाथ उर्फ पप्पू शेठ रेणुसे ( वय 38 राहणार पाबे ) असे त्यांचे नाव असून वेल्हे तालुक्यातील ते रहिवासी आहेत . जमीन खरेदीविक्रीचे काम ते करत करत असायचे. तालुक्याच्या ठिकाणी ते आलेले असताना हॉटेल विसावा येथे बसलेले होते त्यावेळी आरोपी तिथे आले आणि त्यांनी नवनाथ यांच्या तोंडावर धारदार शस्त्राने वार केले त्यांनतर त्यांच्यावर गोळीबार केला आणि दुचाकीवरून फरार झाले . प्राथमिक माहितीनुसार आरोपी त्यांच्याच गावातील असल्याची माहिती समोर आलेले असून जागेच्या वादातून हा प्रकार घडल्याची चर्चा आहे . पोलिसांनी प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली आहे.