पुणे हादरलं..पैसे परत करण्याच्या बहाण्याने लॉजवर आणलं अन..

शेअर करा

महाराष्ट्रात एक खळबळजनक असा प्रकार पुण्यात समोर आलेला असून कल्याण येथील हे प्रकरण आहे . 25 लाख रुपये परत करण्यासाठी एका महिलेला पुण्याला घेऊन जात एका हॉटेलमध्ये तिच्यावर बलात्कार केल्याचा प्रकार समोर आलेला आहे. कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी या प्रकरणी दोन जणांना अटक केलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, श्रीपाद ठोसर याने तीन वर्षांपूर्वी सुमारे 60 लाख रुपये एका महिलेकडून उसने घेतलेले होते त्यातील 25 लाख रुपये अनिल किल्लेदार नावाच्या व्यक्तीने घेतलेले होते. किल्लेदार हा बँकेतून निवृत्त झालेला असून त्याच्याकडे पीडित महिलेने पैशाचा तगादा लावलेला होता त्यामुळे आरोपींनी पैसे देण्याच्या बहाण्याने तिला पुण्याला घेऊन गेले.

पुण्याला नेल्यानंतर एका हॉटेलमध्ये रूम बुक करण्यात आली आणि तिथे या महिलेवर त्यांनी बलात्कार केला सोबतच तिला पैसे देखील दिले नाहीत. पोलिसांनी किल्लेदार याच्या विरोधात फसवणूक आणि बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल केलेला आहे तर ठोसर याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे पुढील तपास करत असल्याची माहिती आहे.


शेअर करा