पुणे हादरलं..मित्रांसोबत गप्पा मारत असतानाच सरपंचांवर केले वार

शेअर करा

महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात समोर आलेली असून शिरगाव येथील सरपंचाची अज्ञात तीन अज्ञात व्यक्तींनी कोयत्याने वार करून हत्या केलेली आहे. सदर घटना ही शिरगाव येथे साई मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर एक तारखेला रात्री सव्वा नऊच्या सुमारास घडलेली असून भरवस्तीत हा प्रकार घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, प्रवीण साहेबराव गोपाळे ( वय 47 ) असे खून झालेल्या सरपंचाचे नाव असून या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रवीण गोपाळे हे सरपंचपदी विजयी झालेले होते. त्यांचा प्लॉटिंगचा व्यवसाय असून जमिनीशी संबंधित काही वादातून हा प्रकार घडल्याची परिसरात चर्चा आहे.

प्रवीण गोपाळे हे शनिवारी रात्री त्यांच्या दुचाकीवरून शिरगाव येथील साई मंदिरासमोर काही जणांशी गप्पा मारत असताना मारेकऱ्यांपैकी दोन जण तिथे आधी आले आणि पाहणी करून निघून गेले. थोड्या वेळाने पुन्हा एकाच दुचाकीवरून तीन जण आले आणि त्यांनी प्रवीण गोपाळे यांच्यावर कोयत्याने वार केले. अचानक झालेल्या या प्रकारामुळे गोंधळ आणि आरडाओरडा झाला त्यात आरोपींनी तेथून पलायन केले. गोपाळे यांच्या चेहऱ्यावर वार केल्यानंतर अवघ्या काही मिनिटात त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन आरोपींचा शोध सुरू केलेला आहे .


शेअर करा