पुणे हादरलं..मोबाईल नंबर शेअर होताच तब्बल ‘ इतक्या ‘ जणांनी केला महिलेचा विनयभंग

शेअर करा

गेल्या काही वर्षांपासून पुणे शहरात महिलांसोबत छेडछाडीचे प्रकार वाढत असल्याचे दिसून येत आहे अशीच एक घटना पिंपरी येथे उघडकीला आली असून एका महिलेला व्हाट्सअपवर असलील मेसेज पाठवून तिचा विनयभंग करण्यात आल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. फेब्रुवारी २०२२ पासून एप्रिल २०२२ या कालावधीत सांगवी परिसरात राहणाऱ्या या महिलेसोबत हा प्रकार घडलेला आहे.

पीडित महिलेने सांगवी पोलिस ठाण्यात या संदर्भात फिर्याद दिलेली असून त्यानुसार तब्बल सहा मोबाईल धारकांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. फिर्यादी महिला या शेअर चॅट या मोबाईलॲप वापरत होत्या. ॲप्लिकेशनच्या माध्यमातून त्यांची अनेक जणांशी ओळख झाली आणि त्यातून फिर्यादी यांचा नंबर इतर ठिकाणी देखील शेअर करण्यात आला त्यानंतर अनेक जणांनी फिर्यादी यांना व्हाट्सअप वरून अश्लील मेसेज आणि एडीट केलेले फोटो शेअर केले. आपल्यासोबत सातत्याने हा प्रकार होऊ लागल्यानंतर पीडित महिला यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली.


शेअर करा