पुणे हादरले..चक्क घरात घुसुन तडीपारने तरुणीचा गाऊन ओढला

शेअर करा

अवघ्या चार दिवसांपूर्वी पुणे येथे एका अल्पवयीन मुलीवर एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने चाकूने वार केल्याची घटना ताजी असतानाच दुसरा एक प्रकार पुण्यात उघडकीला आला आहे. एका तडीपार गुंडाने एका तरुणीच्या घरात शिरून तुझे लग्न कुठेही होऊ देणार नाही, असे सांगत धमकी देऊन तिचा गाऊन ओढून विनयभंग केल्याची घटना घडलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, मोहसीन खान ( राहणार जिजामाता नगर नवी खडकी ) असे या तडीपार गुंडाचे नाव असून त्याच्या विरोधात 21 वर्षाच्या एका तरुणीने फिर्याद दिली आहे. मोहसीन खान हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून पोलिसांनी त्याला तडीपार केले आहे असे असताना तो रविवारी फिर्यादी यांच्या घरी आला आणि त्याने घराचा दरवाजा ठोठावला त्यावेळी फिर्यादीच्या आईने दरवाजा उघडला.

दरवाजा उघडल्यानंतर मोहसीन याने तुमच्या मुलीशी मला लग्न करायचे आहे, असे सांगितले. त्याला फिर्यादीच्या आईने नकार दिला तर त्याने फिर्यादीच्या आईला अश्लील भाषेत शिवीगाळ केली. त्यांचा आवाज ऐकून फिर्यादी बाहेर आल्या असताना मोहसीन याने त्यांचा हाथ पकडून अंगावरील गाऊन ओढून त्यांचा विनयभंग केला आणि तुझे लग्न आता कुठेही होऊ देणार नाही, अशी धमकी दिली त्यानंतर पीडित तरुणीने पोलीस ठाण्यात धाव घेतली असून मोहसीन याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.


शेअर करा