पुणे हादरले..जीवनसाथीवर मैत्रीची सुरुवात अन फ्लॅटवर शेवट

शेअर करा

सोशल मीडियाच्या माध्यमांतून जग जवळ येत असले तरी अनेक गैरप्रकार देखील यामुळे होत आहेत, अशीच एक घटना पुणे येथील उच्चभ्रू समजले जाणाऱ्या हिंजवडी इथे उघडकीस आली असून जीवनसाथी डॉट कॉमवरून ओळख करून इंजिनिअर तरुणीस लग्नाचे आमिष दाखविले आणि त्यानंतर याच इंजिनिअर तरुणाने बर्थडे पार्टीला बोलावून तिच्यावर बलात्कार केला. हिंजवडी येथील भुमकर चौक इथे ही घटना नोव्हेंबर २०२१ मध्ये घडल्याचे पीडितेचे म्हणणे आहे .

उपलब्ध माहितीनुसार , निशांत हरीश चंदनानी (वय ३४, रा. रतलाम, मध्य प्रदेश) असे आरोपीचे नाव असून याप्रकरणी ३२ वर्षीय पीडित तरुणीने २४ जानेवरीला त्याच्या विरोधात फिर्याद दिली आहे .

उपलब्ध माहितीनुसार , पीडित तरुणी ही देखील इंजिनिअर आहे आणि ती घटस्फोटित आहे तसेच आरोपी देखील इंजिनीअर असून तो देखील घटस्फोटित असल्या कारणाने त्याने देखील जीवनसाथी डॉट कॉम वर दुसऱ्या लग्नासाठी आपली नोंद केली होती. दुसरे लग्न करण्यासाठी पीडित तरुणीने देखील जीवनसाथी डॉट कॉम या वेबसाईटवर नाव नोंदणी केली होती. त्यानंतर त्यांची ओळख झाली आणि तरुणाने ‘ मी तुझ्याशी लग्न करणार आहे ‘, असे सांगून आरोपीने पीडित फिर्यादी तरुणीशी मैत्री केली.

आरोपी निशांत हरीश चंदनानी याने त्याच्या वाढदिवसानिमित्त भुमकर चौक, हिंजवडी येथील त्याच्या राहत्या घरी आयोजित केलेल्या बर्थडे पार्टीसाठी पीडित तरुणीला बोलावले मात्र पार्टी रात्री बराच वेळ चालली त्यामुळे आरोपीने ‘ तू एकटी तुझ्या घरी जाऊ नको, रात्र झाली आहे. उद्या सकाळी जा ‘.. असे म्हणून फिर्यादी तरुणीला त्याच्या भुमकर चौक येथील घरी थांबवले आणि रात्री तिच्यासोबत शरीरसंबंध ठेवले तसेच फिर्यादीच्या मनास लज्जा निर्माण करणारे कृत्य केले, असे फिर्यादीत म्हटलेले आहे. पोलीस सदर प्रकरणी तपास करत आहेत.


शेअर करा