पुणे हादरले..’ तुझी नातं कुठंय ‘ म्हणत आरोपी घरात घुसला अन

शेअर करा

महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना उघडकीस येत असून अशीच एक घटना पुणे येथील भोसरी इथे उघडकीस आली आहे .लग्न झालेली नात तिच्या नव-याशी पटत नसल्याने आजीच्या घरी आली असताना एक व्यक्ती घरात घुसला आणि चक्क तिच्या विवाहित नातीसोबत लग्न लावून देण्याची मागणी केली. आजीने संताप व्यक्त केला असताना त्याने चक्क आजीच्या डोक्यात कोयत्याने वार करून तिला गंभीर जखमी केले. शनिवारी ११ तारखेला हा प्रकार शांतीनगर भोसरी इथे रात्री अकराच्या दरम्यान घडला आहे .

उपलब्ध माहितीनुसार, किशोर शिंदे (रा. बोबगाव, पिसाळवाडी, सासवड, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव असून 48 वर्षीय महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात आरोपीच्या विरोधात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी यांच्या नातीचे सुनील महादेव मोरे (रा. बोबगाव, पिसाळवाडी, सासवड) यांच्यासोबत लग्न झाले आहे. मात्र नव-यासोबत तिचे पटत नसल्याने ती मागील तीन महिन्यांपासून फिर्यादी आजीच्या घरी राहत होती मात्र अचानकपणे आरोपी किशोर शिंदे हा घरात घुसला आणि ‘तुमची नात कुठे आहे. मला तिला भेटायचे आहे. तुम्ही माझे तिच्याशी लग्न लावून द्या’ अशी मागणी केली. त्यासाठी फिर्यादी यांनी नकार दिला. संतापलेल्या आरोपीने त्यानंतर फिर्यादी यांच्या डोक्यात कोयत्याने वार करून त्यांना गंभीर जखमी केले. त्यांच्यावर वायसीएम रुग्णालयात उपचार सुरु आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.


शेअर करा